Sunny Deol Upcoming Movie Instagram
मनोरंजन बातम्या

Sunny Deol Upcoming Movie: सनी देओल पुन्हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार, भारत-पाकिस्तान फाळणीवर आगामी चित्रपट?

Sunny Deol Movie: 'गदर 2' या चित्रपटातून अभिनेता सनी देओलने चित्रपटांमध्ये कमबॅक केला आहे.

Pooja Dange

Sunny Deol Movie After Gadar 2:

'गदर 2' या चित्रपटातून अभिनेता सनी देओलने चित्रपटांमध्ये कमबॅक केला आहे. 'गदर 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. 'गदर 2'नंतर आता सनी देओलकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सनी देओल कोणत्या चित्रपटात दिसणार, हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

दरम्यान सनी देओलच्या चित्रपटाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. सनी देओलचा आगामी चित्रपट भारत-पाकिस्तानवर आधारित असणार आहे. चला जाणून घेऊया सनी देओलच्या पुढील चित्रपटाविषयी.

'गदर 2'मध्ये सनी देओलने त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या चित्रपटानंतर सनी देओल फक्त चित्रपटांमध्ये काम करावे अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. दरम्यान पिंकविला या वृत्तसंस्थेने सनी देओलच्या आगामी चित्रपटाविषयी मोठी अपडेट शेअर केली आहे.

'घातक' चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनात बनणाऱ्या चित्रपटामध्ये सनी देओल काम करणार आहे. 'घातक' या चित्रपटामध्ये देखील सनी देओलने मुख्य भुमिका साकारली होती. तसेच राजकुमार संतोषी आणि सनी देओलच्या या चित्रपटाची निर्मिती आमिर खानची निर्मिती संस्था करणार आहे.

वृत्तानुसार, सनी देओलच्या आगामी चित्रपटाची कथा १९४७ साली झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित आहे. या आशयाचे पंजाबी नाटक असून त्याचे चित्रपटात रूपांतर करण्यात येणार आहे. या नाटकाचे नाव 'जिसने लाहोर न देख्या वो जम्याई नहीं' असे आहे.

जर चित्रपटाविषयीचं वृत्त खरं असेल तर राजकुमार संतोषी आणि सनी देओल २७ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. याआधी सनी देओलने राजकुमार संतोषी यांच्यासह 'घातक', 'घायल' आणि 'दामिनी'सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; धडकेनंतर कारनं घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल

Indurikar Maharaj Daughter Royal Engagement: मुलीचं शाही लग्न, बोला इंदुरीकर काय करायचं?

Free Bike For Aadhaar Card Holders: आधारकार्ड असलेल्यांना मिळणार फ्री बाईक? केंद्र सरकारची फ्री बाईकची योजना?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काँग्रेसच्या हालचालींना वेग

Parth Pawar: पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

SCROLL FOR NEXT