Sunny Deol Share Kili Paul Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Sunny Deol Shares Kili Paul Video : माझं स्वप्न पुर्ण झालं... किली पॉलने केला गदर डान्स ; सनी देओलने केला व्हिडीओ शेअर

Kili Paul Dance On Bollywood Song : बॉलिवूड स्टार सनी देओलने त्याचा हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे.

Pooja Dange

Kili Paul Dance On Sunny Deo Gadar Song : सोशल मीडिया कंटेन्ट क्रिएटर किली पॉल अनेक गाण्यांवर व्हिडिओ बनबत असतो. त्याने अगदी मराठी आणि हिंदी गाण्यांवर देखील व्हिडिओ शेअर केले आहेत. किली पॉलने आता सनी देओलच्या 'मैं निकला गड्डी ले के' या गाण्यावर डान्स केला आहे. बॉलिवूड स्टार सनी देओलने त्याचा हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे.

'मैं निकला गड्डी ले के' हे गाणे सनीच्या गदर 2 या चित्रपटासाठी पुन्हा तयार करण्यात आले आहे. अरिजित सिंगने हे नवीन गाणे गायले आहे. (Latest Entertainment News)

किली आणि त्याची बहीण नीमा पॉल यांनी व्हिडिओसाठी पारंपारिक भारतीय पोशाख घातला होता. उदित नारायण यांनी गायलेल्या गदरमधील 'मैं निकला गड्डी ले के' गाण्यावर दोघांनी डान्स केला आहे.

व्हिडिओ पोस्ट करत, किलीने इंस्टाग्रामवर लिहिले, "९० च्या दशकातील बॉलिवूड स्टार सनी देओल यांनी माझे बालपण सुंदर केले आहे, मी लहापणी अनेक बॉलिवूड चित्रपट पाहिले आहेत आणि अभिनेता होण्याचे माझे स्वप्न होते आणि आता मी इथे आहे आणि मी माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि बॉलिवूड कंटेन्टचा भाग झाल्याच्या मला आनंद आहे. एक दिवस माझी स्वप्ने पूर्ण होतील. तोवर या जुन्या गाण्यांचा आनंद घ्या"

किली पॉलचा हा व्हिडिओ सनी देओलने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सध्या गदर २ ची जोरदार चर्चा आहे. गदर २ चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. तारा सिंग आणि साकीना यांची लव्ह स्टोरी २२ वर्षांनी आपल्या भेटीला येणार आहे. गदर २ चा ट्रेलर तसेच नवीन गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT