Sunny Deol reacts to Dharmendra kissing Shabana Azmi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sunny Deol reaction On Dharmendra Kissing Scene : धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किंसिंग सीनवर मुलगा सनी देओलने मौन सोडले; म्हणाला, "माझे वडील काहीही..."

Sunny Deol reacts to Dharmendra kissing Shabana Azmi : सनी देओलने वडील धर्मेंद्रच्या किसिंग सीनवर वक्तव्य केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sunny Deol On Dharmendra Shabana Kissing Scene :

करण जौहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेमकहानी'ची सध्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदोड सुरू आहे. चित्रपट अनेक कारणांनी चर्चेत येत आहे. चित्रपटातील शबाना आझमी आणि धर्मेंद्रच्या किंसिंग सीनवर बॉलिवूडमधून अनेकांनी चौफेर टीका केली आहे. आता स्वतः मुलगा सनी देओलने वडील धर्मेंद्रच्या किसिंग सीनवर वक्तव्य केले आहे.

२८ जुलैला प्रदर्शित झालेल्या 'रॉकी और राणी की प्रेमकहानी'(Rocky Aur Rani Ki PremKahani) चित्रपटात रणवीर आणि आलियाची लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. चित्रपटात आलिया रणवीरसोबत शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन आणि मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. चित्रपटातील शबाना आणि धर्मेंद्र यांचा किंसिंग सीन चांगलाच चर्चेत आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत सनी देओलने वडिल धर्मेंद्र आणि शबाना आझमीच्या किसिंग सीनवर प्रतिक्रिया दिली आहे. 'माझे वडिल काहीही करु शकतात. माझे वडिल एकमेव अभिनेते आहे, जे हे करु शकतात. मी सहसा चित्रपट पाहत नाही.

मी माझे स्वतः चे चित्रपट फारसे पाहत नाही. मी माझ्या वडिलांशी याबद्दल कसे बोलू? माझे वडिल असे व्यक्तिमत्तव आहे की जे सर्व काही स्वतः जवळच ठेवतात.' असे सनी देओल (Sunny Deol)म्हणाला.

धर्मेंद्र आणि शबाना यांना या सीनमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' चित्रपटाच्या कमाईचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. चित्रपटाने १० दिवसात तब्बल १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

SCROLL FOR NEXT