Border 2 shooting  Saam TV
मनोरंजन बातम्या

Border 2 : देशातील सर्वात मोठ्या वॉर फिल्म 'बॉर्डर 2' चे शूटिंग सुरू; सेटवरील पहिला फोटो आला समोर

Border 2 Shooting: सनी देओलचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'बॉर्डर 2' चे शूटिंग सुरु झाले आहे. यासंदर्भात, निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये या चित्रपटात कोणते स्टार दिसणार हे सांगण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Border 2 : गदर 2 च्या बंपर यशानंतर आता सनी देओलचा सर्वात यशस्वी चित्रपट 'बॉर्डर' च्या सिक्वेलचे शूटिंग सुरु झाले आहे. निर्मात्यांनी मंगळवारी बॉर्डर 2 चे शूटिंग सुरू झाल्याची माहिती शेअर केली. सनी देओल २७ वर्षे 'बॉर्डर'चा सिक्वेल असलेल्या 'बॉर्डर 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जूनमध्ये जेव्हा या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली तेव्हा चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. आता निर्माते जेपी दत्ता पुन्हा एकदा 1997 च्या ब्लॉकबस्टर वॉर चित्रपटाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी या चित्रपटात सनी देओलसह वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी सारखे स्टार्स दिसणार आहेत.

'बॉर्डर 2' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्याची घोषणा करताना निर्मात्यांनी चित्रपटाच्या सेटवरील पहिला फोटो क्लॅपबोर्डसह शेअर केला आहे. फोटोमध्ये क्लॅपबोर्डवर चित्रपटाचे नाव लिहिले आहे आणि सीन, शूट बद्दल माहिती लिहिली आहे. याशिवाय बॅकग्राऊंडला युद्ध रणगाड्याचे दृश्य दिसत आहेत.

'बॉर्डर 2'चे शूटिंग झाले सुरू

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “बॉर्डर 2 साठी कॅमेरे सज्ज झाले आहेत. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शक अनुराग सिंग आहेत आणि निर्माता भूषण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्त आहेत. या चित्रपटासारखा ॲक्शन, ड्रामा आणि देशभक्ती याआधी कधीही पाहिली नसेल. हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

'बॉर्डर 2' ची निर्मिती पॉवरहाऊस प्रॉडक्शन टीम करत आहे, ज्यात भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता यांचा समावेश आहे. हा चित्रपट 2026 मधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असेल. 1997 मध्ये रिलीज झालेल्या 'बॉर्डर' या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात 1971 मधील लोंगेवालाच्या लढाईचे चित्रण करण्यात आले होते, ज्यामध्ये भारतीय सैनिकांची एक छोटी बटालियन एका मोठ्या पाकिस्तानी स्ट्राइक फोर्सविरुद्ध लढताना दाखवण्यात आली होती. हा चित्रपट जेपी दत्ता यांनी बनवला होता, ज्यांना वॉर फिल्म मेस्ट्रो म्हणून ओळखले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT