Govinda Affair Saam Tv
मनोरंजन बातम्या

Govinda Affair: 'माझं घर विनाकारण तुटतंय...'; गोविंदाच्या रुमर्ड अफेअरमुळे सुनीता आहुजा हैराण

Govinda Affair: बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने अलीकडेच आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत पुन्हा भाष्य केले आहे.

Shruti Vilas Kadam

Govinda Affair: बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गोविंदाचे नाव राणी स्वर्णकारसोबत जोडले जात असून, दोघांना मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी एकत्र पाहण्यात आले. याआधीही दोघे विमानतळावर एकत्र दिसले होते. त्यामुळे त्यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात चर्चा सुरू झाली आहे.

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने अलीकडेच आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत पुन्हा भाष्य केले आहे. शुक्रवारी दक्षिणेश्वर काली मंदिराला भेट दिल्यानंतर सुनीताने तिच्या आयुष्यातील अडचणींबद्दल भावना व्यक्त केल्या. “माझा संसार विणाकारण मोडला आहे. माझ्यासोबत जे घडत आहे ते योग्य नाही,” असे तिने म्हटल्याचे वृत्त आहे.

संकट दूर करण्यासाठी काली मातेची प्रार्थना

सुनीता आहुजा काली मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात पोहोचली होती. यावेळी तिने आपल्या आयुष्यातील अडचणी आणि संकटे दूर व्हावीत, यासाठी तिने प्रार्थना केली. काली माता ज्याप्रमाणे राक्षसांचा नाश करते, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील संकटांचेही निवारण करेल, अशी आशा तिने व्यक्त केली. यावेळी सुनीताने महिलांनी आपल्या पाठीशी उभे राहावे, तसेच तरुण पिढीनेही तिला समर्थन द्यावे, असे आवाहन केले. तिच्या या वक्तव्यामुळे गोविंदा आणि तिच्या वैवाहिक नात्याबाबत पुन्हा चर्चा रंगली आहे.

राणी स्वर्णकारसोबतच्या नात्यावर गोविंदाचे स्पष्टीकरण

दरम्यान, राणी स्वर्णकारसोबत ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला गेल्याबद्दल गोविंदाने स्पष्टीकरण दिले आहे. राणीसोबतचे त्याचे नाते पूर्णपणे व्यावसायिक असल्याचे त्याने सांगितले. आगामी ‘रूपा’ या चित्रपटाच्या निमित्ताने आशीर्वाद घेण्यासाठी ते दोघे गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेल्याचे गोविंदाने स्पष्ट केले.

Horoscope : ६ राशींचं नशीब पालटणार? १९ ते २५ ऑक्टोबरदरम्यान करिअर आणि पैशाबाबत मोठे संकेत

Political News : ".....तर भारत पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील" भाजपच्या बड्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांनी धरलं धारेवर

Maharashtra News Live Update: आंदोलनापूर्वी अभिजित दिपकेंना पोलिसांनी अडवलं

EPFO चा मोठा निर्णय, पीएफ रिटर्न फाइल करण्याची मुदत वाढवली; शेवटची तारीख काय?

Marathi Ukhane For Womens: महिलांसाठी 7 भन्नाट उखाणे; जे ऐकून सगळेच म्हणतील ‘वाह!’

SCROLL FOR NEXT