Govinda - Sunita Ahuja SAAM TV
मनोरंजन बातम्या

Govinda - Sunita Ahuja : "तुझा शुगर डॅडी इतका श्रीमंत..."; गोविंदाला 'त्या' अभिनेत्रीसोबत पाहून सुनीता आहुजा भडकली|VIDEO व्हायरल

Sunita Ahuja On Govinda : अलिकडेच गोविंदा एका अभिनेत्रीसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाला. त्यावर आता पत्नी सुनीता आहुजाने प्रतिक्रिया दिली आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

गोविंदा-सुनीता आहुजा यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा

अलिकडेच गोविंदा एका अभिनेत्रीसोबत एअरपोर्टवर स्पॉट

सुनीता आहुजा गोविंदावर चांगल्याच भडकल्या

बॉलिवूड अभिनेता गोविंदा कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. नुकताच तो अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारसोबत (Komal Rani Swarnkar) दिसल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना सुरुवात झाली. आता या प्रकरणात गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. जी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अलिकडेच गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार एकत्र विमानतळावर स्पॉट झाले होते.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, पापाराझीं बोलताना सुनीता आहुजा म्हणाली की, "चित्रपट बनवायचा आहे. तो बनल्यानंतर त्याचं प्रमोशन होतं. मी काय बोलू... तो त्याच्या मुलीच्या वयाच्या मुलीला घेऊन फिरतोय. त्याला लाज वाटायला हवी. स्टँडर्ड असायला हवा. तुझा 'शुगर डॅडी' इतका श्रीमंत आहे, तिने नीट कपडे घालायला हवेत. आमच्याकडे बघ, आम्ही किती स्टाईलमध्ये फिरतो. वाईट वाटतं, त्याचं डोकं फिरलंय."

यापूर्वी गोविंदाने एएनआयशी बोलताना त्यांच्या कथित अफेअरबद्दल सुनीताच्या दाव्यांबद्दल बोलताना म्हणाला, "ती मला खूप प्रेमाने रागावते आणि मला ओरडते आणि मी ते प्रेमाने स्वीकारले..." या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा भरभरून वर्षाव करत आहेत. गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार लवकरच 'रूपा' या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

गोविंदा- सुनीता यांचे नाते

गोविंदा आणि सुनीता आहुजा दोघे 1987 मध्ये लग्न बंधनात अडकले. यांना दोन मुलं देखील आहेत. टीना आणि यशवर्धन. अलिकडेच सुनीता आहुजा 'लॉकअप २'मध्ये दिसल्या होत्या. तेव्हा गोविंदा देखील सुनीता आहुजाला भेटायला 'लॉकअप २' मध्ये आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Speech LIVE: "दुसऱ्यांवर अवलंबून राहणे थांबवा, स्वतःच्या ताकदीवर आत्मनिर्भर व्हा!" पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना आवाहन

PM Modi Speech : लहान स्वप्ने नको, २०४७ पर्यंत 'विकसित भारत' घडवणार, मोदींचे देशवासीयांना ऐतिहासिक संबोधन

Maharashtra News Live Update: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सजावट

20 वर्ष होऊनही झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प होईना! नागरिक संतप्त, शाह हाऊसकॉनला हटवण्याची मागणी

Saturday Horoscope : जबाबदारी वाढेल! पैशातील अडथळे दूर होतील, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT