Sunil Pal Saam tv
मनोरंजन बातम्या

Sunil Pal: मुंबईत प्रसिद्ध कॉमेडियनचा अपमान; मंचावर बोलावून सत्कार केला, नंतर माईक हिसकावून खाली पाठवलं, VIDEO व्हायरल

Sunil Pal: मुंबईतील मुशायऱ्यात कॉमेडियन सुनील पाल यांचा अपमान झाल्याचा व्हिडिओ व्हायरल. मंचावरून खाली उतरवण्याच्या घटनेवर चाहत्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर चाहते आणि प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत.

Shruti Vilas Kadam

Sunil Pal: प्रसिद्ध विनोदवीर सुनील पाल यांच्याशी मुंबईतील एका मुशायऱ्यात झालेल्या वागणुकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सुनील पाल यांना मंचावर बोलावून घेतल्यानंतर त्यांच्याशी अत्यंत अपमानास्पद वर्तन केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या घटनेमुळे चाहत्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ISKCON जुहू येथे आयोजित एका मुशायऱ्यादरम्यान घडली. कार्यक्रमात अनेक कवी उपस्थित होते. त्यावेळी एका व्यक्तीने सुनील पाल यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी मंचावर आमंत्रित केले. त्यांनी नम्रपणे अभिवादन करत माईकवरून आभार मानण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्याच वेळी मंचावर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्यांना वारंवार खाली उतरायला सांगितले. सुनील पाल यांनी “किमान मला आभार तरी मानू द्या,” अशी विनंती केली. तरीही त्या व्यक्तीने उद्धटपणे “जा, तुझ्या जागेवर बस” असे म्हणत त्यांच्या हातातील माईक हिसकावून घेतला आणि त्यांना जबरदस्तीने मंचावरून खाली उतरवले.

या प्रसंगात सुनील पाल यांनी संयम राखला. माईक नसतानाही त्यांनी प्रेक्षकांकडे पाहून आभार व्यक्त केले आणि त्या व्यक्तीला उद्देशून “तुम्ही किती संकुचित मनाचे आहात,” असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी चेहऱ्यावर स्मित ठेवत सभागृह सोडला.

या घटनेदरम्यान प्रेक्षकांनीही त्या व्यक्तीला सुनील पाल यांना बोलू देण्याची विनंती केली होती. मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे उपस्थितांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. हा व्हिडिओ १७ जानेवारी २०२६ रोजीचा असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या प्रकाराचा निषेध करत संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

SCROLL FOR NEXT