Sanjay Dutt Father Sunil Dutt Birth Anniversary Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sunil Dutt Birth Anniversary: दिग्गज अभिनेते असलेल्या सुनील दत्त यांनी सुरुवातीला केलंय बस कंडक्टरचं काम, असा आहे त्यांचा जीवनप्रवास

Sunil Dutt Life Untold Story: सुनील दत्त यांनी आपल्या सिनेकारकिर्दित अनेक चढ उतार पाहिले असून त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकूया...

Chetan Bodke

Sanjay Dutt Father Sunil Dutt Birth Anniversary: सुनील दत्त अभिनयासह राजकारणात गाजलेलं नाव. आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात सुनील दत्त यांनी आपले स्थान निर्माण केले. ६ जून १९२९ रोजी जन्मलेल्या सुनील दत्त यांचा झेलम येथे जन्म झाला. सुनील दत्त यांनी आपल्या सहा दशकांच्या बॉलिवूड कारकिर्दित अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकरली आहे. सुनील दत्त यांनी आपल्या सिनेकारकिर्दित अनेक चढ उतार पाहिले असून त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकूया...

सुनील दत्त यांनी वयाच्या पाचव्या वर्षी वडील गमावले असून, त्यांचे बालपण खूप कठीण गेले. आई कुलवंती देवींनी पोटाची खळगी भरण्यासाठी नोकरी करून मुलाचे पालन पोषण केले. यादरम्यान सुनीलने आपले शिक्षण न सोडता उच्च शिक्षणासाठी मुंबई गाठली. सुनीलने मुंबईतील जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मुंबईत आल्यानंतर सुनील यांच्याकडे आपले पोट भरण्यासाठी देखील पैसे नव्हते. शिक्षण कायम ठेवत सुनीलने बस कंडक्टर म्हणून काम करत स्वत:चा उदरनिर्वाह केला होता. (Bollywood Actor)

बस कंडक्टर म्हणून काम करताना सुनीलने आपल्या मनात आपल्याला काही तरी वेगळं आणि मोठं बनायचं आहे, ही जिद्द ठेवली. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर सुनील दत्त यांनी रेडिओ जॉकी म्हणून देखील काम केले. त्यावेळी रेडिओ सिलोनमध्ये सुनीलला निवेदक म्हणून सर्वाधिक पसंती मिळत होती. चांगली नोकरी करूनही सुनीलची अभिनेता बनण्याची इच्छा वाढू लागली होती. पुढे त्याने आपले स्वप्न उराशी बाळगलं आणि त्यासाठी तयारी सुरू केली. (Bollywood Film)

सुनील दत्त यांनी अनेक वर्षे आरजेची नोकरी केली. 1955 मध्ये सुनील दत्त यांना पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. या चित्रपटाचे नाव होते ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’, त्याचे दिग्दर्शन रमेश सजगल यांनी केले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करू शकला नव्हता. अभिनेते सुनील दत्त यांचे हे खरे नाव नसून रमेश सगल यांनी ‘सुनील दत्त’ हे नाव ठेवले होते. सुनील दत्त यांचे खरे नाव, बलराज दत्त असे होते. १९५७ मध्ये आलेल्या ‘मदर इंडिया’ चित्रपटातून सुनील यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. यानंतर करिअरमध्ये पुढे जाताना त्यांनी ‘साधना’, ‘इंसान जाग उठा’, ‘मुझे जीने दो’, ‘खानदान’ यासह अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट काम केले. (Entertainment News)

सुनील दत्त यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी देशात मनमोहन सिंग यांचे सरकार होते. तेव्हा सुनील दत्त राज्यसभेचे खासदार होते. याशिवाय त्याच सरकारमध्ये त्यांच्याकडे युवा आणि क्रीडा खात्याचा मंत्रिपदही देण्यात आले होते. सुनील दत्त यांनी आपल्या खात्यासंबंधित अनेक गरजूंना मदत केली होती. मात्र, या ज्येष्ठ कलाकार आणि यशस्वी राजकारण्याने २५ मे २००५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने जगाचा कायमचा निरोप घेतला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

SCROLL FOR NEXT