Sunil Shetty On Marathi Language Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sunil Shetty On Marathi Language: मला बोलायला भाग पाडू नका...; हिंदी-मराठी भाषा वादावर सुनील शेट्टीचं सडेतोड विधान

Sunil Shetty On Marathi Language: महाराष्ट्रात हिंदी आणि मराठी भाषेचा वाद अनेकदा चर्चेचा विषय बनतो. सुनील शेट्टी यांनी आता या विषयावर आपले मौन सोडले आहे. ते म्हणतात की त्यांना दोन्ही भाषा बोलण्यास भाग पाडले जाऊ नये.

Shruti Vilas Kadam

Sunil Shetty On Marathi Language: महाराष्ट्रात हिंदी-मराठी भाषेचा वाद अजूनही चर्चेचा विषय आहे. राज्य सरकारने मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतल्यापासून हा वाद सुरू झाला. या विषयावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपले मत व्यक्त केले आहे. आता, सुनील शेट्टी यांनीही भाष्य केले आहे.

सुनील शेट्टी यांनी एएनआयला सांगितले की, "मी खूप लहान वयातच म्हैसूर सोडलं. कारण मला दुसरं कोणी बनायचं होत म्हणून नाही तर हे पाऊल मी नविन संधीसाठी उचललं. मी मुंबईत करिअर करूनही माझी स्वतःची ओळख विसरलो नाही.

'मला भाषा बोलण्याची सक्ती करू नका'

सुनील शेट्टी म्हणाला, "मी जे काही करतो तेव्हा माझ्यामुळे मंगळुरूचे प्रतिबिंबित झळकते. "जेव्हा कोणी मला विचारतात, 'मराठीबद्दल काय?' तेव्हा मी म्हणतो, 'मराठीबद्दल काय? मग लोक बोलतात, 'नाही, तुम्हाला मराठी बोलायलाच हवे. तेव्हा मी त्यांना सांगतो, 'मी बांधील नाही. मी जेव्हा वाटेल तेव्हा बोलेन. मला कोणतीही भाषा बोलण्याची सक्ती करू नका."

मी महाराष्ट्रातील मुलांपेक्षा चांगले मराठी बोलतो.

सुनील शेट्टी पुढे म्हणाले, "जर हे माझे कामाचे ठिकाण हे असेल, तर इथल्या लोकांना वाटत मला या ठिकाणची भाषा यावी आणि मला ती भाषा खरचं येत असेल तर तीच लोक खूप आनंदी होतात. आज मुंबईत राहणाऱ्या बहुतेक महाराष्ट्रीयन मुलांपेक्षा मी कदाचित चांगली मराठी बोलतो."

सुनील शेट्टीचा आगामी चित्रपट

१९९२ मध्ये आलेल्या 'बलवान' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश करणारा सुनील शेट्टी २०२५ मध्ये 'केसरी वीर' मध्ये दिसले होते, त्यानंतर लवकरच 'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SSC-HSC Board Exam: दहावी-बारावीची परीक्षा होणार कॉपीमुक्त; परीक्षा केंद्रावर असेन दक्षता समितीची नजर

Sahar Shaikh vs Navneet Rana: मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्या सहर शेखवर नवनीत राणा कडाडल्या; म्हणाल्या, पाकिस्तानात जा!

Face Wrinkles: फक्त १० रुपयांमध्ये चेहऱ्यावरील रिंकल्स दूर करा, वापरा 'हा' घरगुती उपाय

Maharashtra Live News Update : दावोस दौऱ्यामुळे 30 लाख कोटींची गुंतवणूक - CM फडणवीस

Shepu Bhaji Recipe : शेपूची भाजी फारच तुरट लागते? मग बनवताना 'हा' पदार्थ नक्की टाका

SCROLL FOR NEXT