Suniel Shetty In Desi Vibes with Shehnaaz Gill For Hunter Promotion Saam TV
मनोरंजन बातम्या

Suniel Shetty-Shehnaaz Gill: पॉपकॉर्नच्या वाढत्या किंमतीवर सुनीत शेट्टी स्पष्टच बोलला

Desi Wibe With Shehnaaz Gill: शेहनाजने त्यांच्या संभाषणातील एक गंमतीशीर किस्सा शेअर केला आहे.

Saam Tv

Suniel Shetty In Shehnaaz Gill Chat Show: 'देसी वाइब्स विथ शेहनाज गिल' या कार्यक्रमात ती विविध कलाकारांना आमंत्रित करते. यावेळी शेहनाज गिलच्या या शोमध्ये सुनील शेट्टीला यांनी हजेरी लावली होती. अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केली. पण त्यांच्या एक विषय सर्वांच्या जवळचा होता. त्यावर त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. शेट्टीने गिलच्या हंटर या नव्या वेबसीरीज प्रमोशनसाठी चॅट शोमध्ये सहभागी झाला होता.

शेहनाजने तिच्या चॅट शोच्या टीझरचा व्हिडिओ शेअर केला आहे. शेहनाजने त्यांच्या संभाषणातील एक गंमतीशीर किस्सा शेअर केला आहे.

शेहनाज सुनीलला म्हणते, "आजकाल जेव्हा मी थिएटरमध्ये चित्रपट बघते, पॉपकॉर्नची किंमत 1,400-1,500 रुपये झाले आहे. यावर सुनील तिला म्हणतो मला माहीत आहे. मग शेहनाज सुनील अण्णाला विचारतो, "इतकं महाग का आहे?" सुनील थांबतो आणि म्हणतो, "मी विकत नाही. त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही. माझ्या कंपनीचे नाव पॉपकॉर्न आहे." सुनील शेट्टीने त्याच्या प्रोडक्शन हाऊस पॉपकॉर्न एंटरटेनमेंटविषयी येथे सांगितले आहे.

शेहनाजने व्हिडिओ शेअर करताच, अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, "हे गंमतीशीर आहे." आणखी एका युजरने लिहिले, "पाहुण्यांना अशा गोष्टी विचारतो का."

गायक गुरू रंधावाने लिहिले आहे, "शहनाज तुझे विनोद पुरे झाले." एका युजरने लिहिले आहे, "ती बरोबर आहे, म्हणूनच मी बॉलीवूड चित्रपट पाहत नाही.एवढा महागडा पॉपकॉर्न कोण खाईल, आणि ते आम्हाला आमच्या घरूनही काही आणू देत नाहीत.”

शेहनाज गिलसोबत सुनील शेट्टीचे देसी वाइब्सवरील ही मुलाखत आज सकाळी ११:११ वाजता शेहनाज गिल यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाली आहे. शेहनाज गिल सलमान खानच्या किसी का भाई किसी की जानमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांना पिक विमा 15 डिसेंबर पर्यंत काढता येणार

Horoscope: सहा राशींवर शनि महाराज कृपा; संकटं होतील दूर; आर्थिक लाभाचे योग, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

SCROLL FOR NEXT