Shah Rukh Khan And Suniel Shetty
Shah Rukh Khan And Suniel Shetty Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suniel Shetty: माझ्यामुळे बदलला शाहरुखने 'मैं हूं ना'चा क्लायमॅक्स, १९ वर्षांनंतर सुनीलने स्पष्ट केले कारण

Chetan Bodke

Shah Rukh Khan And Suniel Shetty: अभिनेता सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये आपल्या सिनेकारकिर्दिला ३१ वर्षे पूर्ण केली आहेत. तीन दशकांच्या या यशस्वी कारकिर्दीत सुनील शेट्टीने अनेक प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले. आतापर्यंत सुनीलने संजय दत्त ते अजय देवगण, अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांच्यासोबत चित्रपट केले.

सुनील शेट्टीने शाहरुखसोबत ‘मैं हूं ना’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात शाहरुखने हिरोची भूमिका साकारली होती तर सुनील शेट्टी खलनायकाच्या भूमिकेत होता. चित्रपटाबद्दल सुनीलने एक मुलाखत दिली आहे, सध्या ती मुलाखत बरीच चर्चेत आहे.

सुनील शेट्टीने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, ‘मैं हूं ना’च्या क्लायमॅक्सची बातच काही और आहे, पण शाहरुख त्याच्यामुळे तो बदलला. सुनील शेट्टी सध्या ‘हेरा फेरी 3’ मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यासोबत पुन्हा एकत्र आला आहे, तर सुनील ‘हेरा फेरी 3’च्या माध्यमातून संजय दत्तसोबतही दिसणार आहे. सुनील शेट्टीने 'बॉलिवूड बबल'शी संवाद साधत या सर्व कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.

शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना सुनील शेट्टी म्हणाला, “मी शाहरुखसोबत ‘मैं हूं ना’ चित्रपटाची शूटिंग केली होती. तो चित्रपटातील सर्वच कलाकारांना सुपरस्टारप्रमाणे वागणूक द्यायचा. शाहरुख हा इंडस्ट्रीतील सर्वात चांगला अभिनेता आहे. मी त्याच्यासारखा अभिनेता बॉलिवूडमध्ये अद्याप पाहिलेला नाही. ‘मैं हूं ना’च्या क्लायमॅक्स सीनमध्ये तो मागे पडला आणि म्हणाला की मी सुनील शेट्टीला हरवू शकत नाही. त्याने बॉम्बची पिन काढून हातात पकडली आणि म्हणतो, शारीरिकदृष्ट्या मी सुनील शेट्टीला हरवू शकत नाही. तो एवढा चांगला व्यक्ती आहे.”

सुनील शेट्टी म्हणतो, “शाहरुखने माझा रियल लाईफमध्ये इतका आदर केला की, त्याने चित्रपटात त्याला मारण्यास नकार दिला आणि क्लायमॅक्सच बदलला. सुनील शेट्टीच्या मते, शाहरुख खरा मोहक आहे जो कोणाचेही मन जिंकू शकतो.” ‘मैं हूं ना’ या चित्रपटाचे दिग्दर्शन फराह खानने केले होते.

या चित्रपटात सुनील शेट्टी दहशतवादी राघवन दत्ताच्या भूमिकेत दिसला होता. यातील नकारात्मक भूमिकेसाठी सुनीलला फिल्मफेअरचे नामांकनही मिळाले होते. त्याचवेळी शाहरुख खानला त्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन मिळाले. ‘मैं हूं ना’ चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता.

सुनील शेट्टी लवकरच ‘हेरा फेरी 3’ मध्ये दिसणार आहे. नुकतीच सुनीलची ‘हंटर’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली असून तो तो एसीपी विक्रम चौहानच्या भूमिकेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Accident: ब्रेकिंग! नाशिकमध्ये कार- बसचा भीषण अपघात; ३ जण जागीच ठार

Today's Marathi News Live : नांदगाव - संभाजीनगर रस्त्यावर बस आणि कारचा भीषण अपघात, तिनजण जागीच ठार

Hiccups Treatment : अगं बाई! उचकी लागल्यावर काय कराल?

Zinc Deficiency: शरीरात झिंकची कमतरता आहे? आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Ghatkopar Hoarding Accident: होर्डिंग दुर्घटनेशी त्यांचा संबंध काय? भाजपने ठाकरेंचा फोटो ट्विट केल्यानंतर भुजबळांचा सवाल

SCROLL FOR NEXT