Sundari Serial Updates Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sundari Serial Updates: ‘सुंदरी’ खांद्यावर घेणार नवी जबाबदारी, अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळणार...

Sundari Serial Daily Updates: ‘सुंदरी’ मालिका पहिल्या दिवसापासून चाहत्यांचे निखळ मनोरंजन करीत असून मालिकेमध्ये नवीन पर्वाला सुरुवात झाली आहे.

Chetan Bodke

Sundari Serial Updates

‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ ही मालिका पहिल्या दिवसापासून चाहत्यांचे निखळ मनोरंजन करीत आहे. प्रत्येक भागातली कथा नेहमीच वेगवेगळ्या ट्रॅकला अनुसरुन आपल्याला पाहायला मिळत आहे. आता या मालिकेचे नवीन पर्व सुरु झाले आहे. कोणत्याही महिलेने जर ठरवलं ना तर ती शून्यातून देखील विश्व निर्माण करु शकते. ही गोष्ट मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत असलेली ‘सुंदरी’ या भूमिकेने सिध्द करुन दाखवलंय. कुटुंबाकरिता सदैव उभी राहणारी, प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वांना सांभाळून घेणारी सुंदरी आता स्वत:ची नवी ओळख तयार करणार आहे. (Serial)

सुंदरी फक्त स्वत:च्या करिअरमध्येच एक विशेष स्थान तयार करणार नसून स्वत:च्या आयुष्यातही आईपणाची जबाबदारी पेलणार आहे. सुंदरी आता ‘कलेक्टर’ म्हणून ओळखली जाणार आणि देशसेवेसोबतच अनु आणि आदित्यच्या मुलीची आई हे नातं देखील ती जबाबदारीने पार पाडणार आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या सुंदरी कशी सांभाळेल? सुंदरीचा पुढील प्रवास एका संपूर्ण नव्या कथेने सुरु झाला आहे. (Marathi Film)

प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांना अनेक प्रश्नं पडली असणार, जसे की, सुंदरीने लग्न केलं की नाही? अनु आणि आदित्यच्या मुलीचा सांभाळ सुंदरी का करणार? अनु आणि आदित्य नेमकं कुठे आहेत? त्यांच्या बाबतीत काय घडलंय? त्यांनी त्यांची मुलगी सुंदरीकडे का दिली असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच या नवीन पर्वात उलगडतील. (Social Media)

जसे मालिकेचे कथानक नवीन आहे त्याचप्रमाणे नवीन कलाकार देखील या मालिकेचा भाग बनणार आहेत. ‘सुंदरी’ची भूमिका अभिनेत्री आरती बिराजदारच साकारणार असून अभिनेता सौरभ चौघुले आणि अभिनेत्री वनिता खरात हे दोन नवीन कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. पूर्वी मालिकेचा सेट कोल्हापूर येथे होता परंतु आता मालिकेचा सेट मुंबईत आहे. नवीन कथा, नवीन कलाकार प्रेक्षकांची मालिकाप्रती उत्सुकता वाढवतील हे नक्की. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT