Shilpa Shetty Saam Tv
मनोरंजन बातम्या

शिल्पा-शमिता आणि त्यांच्या आई विरोधात समन्स जारी, 28 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

अंधेरीच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून त्यांना समन्स बजावण्यात आले आहे.

सुरज सावंत

शिल्पा शेट्टी, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई यांना फसवणूक केल्याप्रकरणी समन्स बाजवणायत आले आहे. अंधेरीच्या (Andheri) न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. तसेच २८ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. शिल्पा (Shilpa Shetty) सोबतच बहीण शमिता (Shamita Shetty) आणि आई सुनंदा शेट्टी यांना देखील समन्स बाजवणायत आले आहे. 21 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी या तिघींना समन्स बाजवणायत आले आहे.

हे देखील पहा -

अमरा या ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकाने फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, वडिलांनी २०१५ मध्ये घेतलेले कर्ज फेडण्यात शिल्पा शेट्टी, बहीण शमिता आणि आई सुनंदा यांना अपयश आले. सुरेंद्र यांनी वार्षिक १८ टक्के व्याजाने कर्ज घेतले होते.

कॉर्गिफ्ट्स नावाच्या कंपनीमध्ये शिल्पा, तिचे वडील, बहीण, आई भागीदार आहेत, याच कंपनीच्या नावावर कर्ज घेतले होते. 2016 मध्ये शिल्पाचे वडील सुरेंद्र यांचे निधन झाले तेव्हापासून शिल्पा, शमिता आणि त्यांच्या आईने कर्जाची परतफेड करण्यास नकार दिला.2017 रोजी अमराने नोटीस पाठवली, त्यानंतर जुहू पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली, त्यानंतर त्यांनी अंधेरी येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात खासगी तक्रार दाखल केली होती.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime Branch: वसुली पोलीस! पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

Bihar Election Result: २२७१ लोकांचा विश्वास… पण नियतीचा क्रूर खेळ; मतमोजणीच्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू

By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

Bihar Election Result Live Updates : बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

SCROLL FOR NEXT