Sulochana Latkar Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sulochana Latkar: वयाच्या 14 व्या वर्षी लग्न, 300 हून अधिक चित्रपटात केलं काम; सुलोचना दीदींची प्रेरणादायी कारकीर्द

वयाच्या 14 व्या वर्षी लग्न, 300 हून अधिक चित्रपटात केलं काम; सुलोचना दीदींची प्रेरणादायी कारकीर्द

Satish Kengar

Sulochana Latkar Passed Away: भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळाच्या साक्षीदार असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांना प्रेमाने आणि आदराने 'सुलोचना दीदी' असं म्हणायचे. तब्येत बिघडल्याने सुलोचना दीदी यांना आज मुंबईतील सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वयाच्या १४ व्या वर्षी झालं लग्न

सुलोचना दीदींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे तर, सुलोचना लाटकर यांचा जन्म २० जुलै १९२८ रोजी झाला. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांचे लग्न झालं. सुलोचना यांना कांचन नावाची मुलगी आहे. कांचनने प्रसिद्ध मराठी अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्याशी लग्न केलं. सुलोचना यांना १९९९ मध्ये पद्मश्री आणि २००४ मध्ये फिल्मटाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.  (Latest Entertainment News)

वयाच्या चौथ्या वर्षी चित्रपटात बालकलाकार म्हणून केलं काम

सुलोचना दीदींनी २५० हिंदी आणि ५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. १९३२ मध्ये माधुरी या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. चित्रपटात काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांचं वय अवघं ४ वर्ष होतं.

लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम केल्याने सुलोच दीदींनी खूप नाव मिळवलं. त्यामुळेच त्यांना अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधीही मिळाली. एक दशकाहून अधिक काळ मुख्य अभिनेत्रीची भूमिका केल्यानंतर, त्यांनी त्या काळातील सुनीत दत्त आणि देव आनंद यांसारख्या सुपरस्टार्सच्या आईची भूमिका साकारण्यास सुरुवात केली. त्यातही सुलोचना दीदींनी बऱ्यापैकी यश मिळवलं.

२५० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं

सुलोचना दीदींनी जवळपास सात दशकांच्या आपल्या कारकिर्दीत २५० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्या एक प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री देखील होत्या. त्यांनी ५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आणि आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. मेरे जीवन साथी, कटी पतंग, प्रवेश आणि त्याग यासारख्या प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका केल्या.

या चित्रपटांमध्ये केलं काम

सुलोचना दीदींच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर खून भरी मांग, आशा, कटी पतंग, जॉनी मेरा नाम, आदमी, देवर, कहानी किस्मत की, अब दिल्ली दूर नहीं, दिल देके देखो, बंदिनी, नई रोशनी, आदमी, जोहर महमूद इन गोवा आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.  (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: उपराष्ट्रपतीच्या मतदानावेळी इंडिया आघाडीची नाही तर BJPची मतं फुटली, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

Nepal News : महाराष्ट्रातील १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले, सर्वाधिक पर्यटक 'या' जिल्ह्यातील | VIDEO

Maharashtra Live News Update : माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण, पूजा गायकवाडला 3 दिवसाची पोलीस कोठडी

लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण; तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरणात खासदार निंबाळकर आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Viral : घोर कलयुग! मंदिरात नाचवली रशियन तरुणी, Video पाहून लोक संतापले

SCROLL FOR NEXT