The Archies Movie poster saam tv
मनोरंजन बातम्या

The Archies Movie : नवख्या अभिनेत्रींची होणार एन्ट्री! सुहाना खान ,खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा झळकणार

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सध्या सिनेविश्वात तुफान चर्चेत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची (Shahrukh khan) मुलगी सुहाना खान सध्या सिनेविश्वात तुफान चर्चेत आहे. मुंबईतील बॉलिवूडच्या इव्हेंट्सलाही सुहाना तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत उपस्थिती दर्शवत असते. सुहाना (suhana khan) सिनेमात कधी झळकणार ? असा प्रश्न सुहानाच्या अनेक चाहत्यांना पडला होता. परंतु, आता सुहाना लवकरच पडद्यावर झळकणार असून झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या सिनेमातून (The Archies Movie) पदार्पण करणार आहे. त्यामुळे सुहानाच्या चाहत्यांची सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खुशी कपूर (khushi kapoor) आणि अगस्त्य नंदा (Agstya Nanda) यांच्यासह द आर्चीज सिनेमाची संपूर्ण टीम उटीमधून चित्रीकरण करुन दुसऱ्या लोकेशनवर पोहचली आहे. त्यानंतर झोया या सिनेमाचं पुढील चित्रीकरण मॉरिशसमध्ये करण्याच्या विचारात आहे. तर जुलै अखेरीस या सिनेमाच्या गाण्यांचे चित्रीकरण मुंबईत होणार असल्याची माहिती समोर येत आहे. द आर्चीज'या सिनेमातील मुख्य भूमिका साकारणारी सुहाना खान,अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर 'क्लासरूम' या थीमद्वारे गाण्यांचं चित्रीकरण करण्यात व्यग्र आहेत. या गाण्यांच्या चित्रीकरणाची जबाबदारी झोया अख्तरने नृत्यदिग्दर्शक बॉस्को आणि सीझरवर सोपवली आहे. जुलैमध्येच या गाण्यांचे चित्रीकरण पूर्ण होणार आहे. दरम्यान, बॉस्को आणि सीझरने झोयाच्या अनेक चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे.

'द आर्चीज' या सिनेमातीस गाण्याचे शूटिंग मुबंईतील गोरेगाव येथील स्टुडिओमध्ये होणार असून संपूर्ण टीमने उटीमध्ये नृत्य सादर करण्यासाठी सराव केला आहे. या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान सुहानाचा २२ वा जन्मदिवसही साजरा करण्यात आला आहे. सुहानाने तिच्या वाढदीवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, या सिनेमाचं क्लासरूम' हे गाणे शाळेतील वर्गात चित्रीत केले जाणार असून सर्व युवा अभिनेते शाळेच्या गणवेशात झळकणार आहेत.

द आर्चीज या सिनेमात सुहाना खान, अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर या नवख्या अभिनेत्रींचे पदार्पण होणार आहे. याशिवाय मिहीर आहुजा,डॉट,युवराज मेंडा आणि वेदांग रैना हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.चित्रपट हा प्रसिद्ध कॉमिक्स बुक 'आर्चीज'या बॉलीवूड रूपांतरावर आधारित आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतत प्रेक्षकांना शाळेतील किस्से आठवतील. शाळेतील जुन्या आठवणींना या सिनेमाच्या माध्यमातून उजाळा दिला जाणार आहे. नेटफ्लिक्सने या सिनेमाची आर्ची कॅामीक्ससोबत भागीदारी केली आहे.चित्रपट निर्मात्या झोया अख्तर आणि तिचा सहकारी रीमा कागती हे प्रोडक्शन हाऊस टायगर बेबी अंतर्गत चित्रपटांची निर्मिती करत आहेत.चित्रपट नेटफ्लिक्सवर २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT