New Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

Subodh Bhave and Tejashri Pradhan New Movie :सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे.

Manasvi Choudhary

मराठीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान ही जोडी लवकरच एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शुभम फिल्म प्रोडक्शनच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या आगामी सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे.

सिनेमाच्या टीझरमध्ये घरच्यांच्या सांगण्यानुसार दोन मध्यमवयीन 'तरुण तरुणी' लग्नासाठी 'पाहाण्याच्या कार्यक्रमा'निमित्ताने भेटत आहेत. यावेळी ते एकमेकांच्या वयाचा अंदाज बांधताना दिसत आहेत. टीझरमधील संवाद मजेशीर असून प्रेक्षकांच्या मनात घर करणार आहेत. सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची केमिस्ट्री या टीझरमध्ये खुलून दिसत आहे. त्यामुळे आता थोडीशी लेट पण एकदम थेट सुरू झालेली ही सफर पाहायला मजा येणार आहे. यात सुबोध भावे, तेजश्री प्रधान यांच्यासह प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन आनंद दिलीप गोखले यांनी केले असून, निर्माते शेखर विठ्ठल मते आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, “हा चित्रपट आजच्या काळातील लग्न आणि नातेसंबंधांच्या बदलत्या संकल्पनेवर आधारित आहे. आत्ताच्या पिढीच्या विचारसरणीत मोठा बदल झाला असून हाच विचार चित्रपटात मांडला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल अशी आशा आहे.”

निर्माते शेखर विठ्ठल मते म्हणतात, '' हा चित्रपट आजच्या काळाचा असून तो संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावा असा आहे. काळानुसार तरुणांची विचारसरणी बदलत चालली असून त्यामागे त्यांची काही ठोस कारणे आहेत. तरुणाईचे हेच विचार यात मांडण्यात आले आहे. आपल्यापैकी अनेकांना हा चित्रपट आपल्या जवळचा वाटेल.'' २० डिसेंबरला सिनेमागृहात हा चित्रपट रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी

Crime: संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून...

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

SCROLL FOR NEXT