लोकप्रिय गायक सोनू निगमने आपल्या आवाजाने सर्वांवर जादू केलीय. लहान मुले असो की वृद्ध सर्वांना सोनू निगमने आपल्या मधुर आवाजाने सर्वांनाच आपले फॅन बनवले आहे. सोनू कुठेही गेला तरी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमते. मात्र दिल्लीच्या एका महाविद्यालयात होत असलेल्या कार्यक्रमात गर्दी अनियंत्रित झाली. आणि लाखो लोकांच्या गर्दीतून स्टेजवर दगडफेक झाली.
सोनू निगमच्या लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान दगडफेक झालीय. तर काही प्रेक्षकांनी स्टेजवर बाटल्या फेकल्या. यामुळे आयोजकांना कार्यक्रम थांबवावा लागला. दगडफेक होत असल्याचं पाहून सोनूने प्रेक्षकांना शांत होण्याचं आवाहन केलं. या काळात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेमुळे सोनूने परफॉर्मन्स अर्ध्यात थांबवला.
हा कॉन्सर्ट दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या (DTU) 'EngiFest 2025' मध्ये होत होता. सोनू निगमचे गाणे ऐकण्यासाठी एक लाख विद्यार्थी जमले होते. गायकाच्या परफॉर्मन्सदरम्यान काही विद्यार्थ्यांनी स्टेजवर दगड आणि बाटल्या फेकल्या. अशा स्थितीत सोनूने शो बंद केला. सोनूने रविवारी रात्री हा कॉन्सर्ट केला. यावेळी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. सुरुवातीला, एका चाहत्याने सोनूच्या दिशेने गुलाबी हेडबँड टाकला तो सोनूने आपल्या डोक्यावर लावला होता.
कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी स्टेजवर दगडफेक का केली याची काही माहिती मिळाली नाहीये. काहींच्या मते मस्ती आणि खोडसाळपणामुळे दगडफेक केली गेली असावी. परंतु या घटनेमुळे गायक सोनू निगमला अर्ध्यात आपला कार्यक्रम थांबवावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.