Stree 2 Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Stree 2' Box Office Collection Day 5: श्रद्धाच्या ' स्त्री २ ' सिनेमाची छप्पर फाड कमाई, ५ व्या दिवशी पार केला २५० टप्पा

Sharddha Kapoor & Rajkumar Rao's Stree 2 Box office Review : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री २' चित्रपटाने सिनेसृष्टीमध्ये नवा इतिहास रचलाय. १५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या 'स्त्री २' ने तब्बल दोनचं दिवसांमध्ये हाफ सेंच्युरी पूर्ण केली. प्रेक्षकांकडून चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Stree 2 Box Review: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री २' चित्रपटाने सिनेसृष्टीमध्ये नवा इतिहास रचलाय. स्वातंत्र्यदिनाला प्रदर्शित झालेल्या 'स्त्री २' ने तब्बल दोनचं दिवसांमध्ये कमाईची हाफ सेंच्युरी पूर्ण केली. प्रेक्षकांकडून चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री २' ने बॉक्स ऑफिसवर चांगलाचं धुमाकूळ घातलाय. पहिल्याचं दिवशीपासूनच 'स्त्री २' या चित्रपटाने प्रेक्षकांचे मनं जिंकलीत. 'स्त्री २' या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी सारखे कलाकांनी मुख्य भूमिका साकारली आहे.'स्त्री २' २०२४ चा सर्वात 'बेस्ट हॅारर कॉमेडी चित्रपट' ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी दिलीय.

'स्त्री २' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय. रक्षाबंधनाचा सण आणि विकेंड असल्यामुळे अनेक प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये गर्दी केली होती. गेल्याचं आठवड्यात २०० कोटींचा आकडा 'स्त्री २' या चित्रपटानं पार केला आहे. चित्रपटामधील श्रद्धा आणि राजकुमार राव यांची जोडी प्रेक्षकांना आवडलीय.

चित्रपटत प्रदर्शित झाल्या दिवशीपासूनच बॉक्स ऑफिसवर ४५.७० कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाचं होणारं कौतुक केल्यानंतर चित्रपटगृहात सिनेरसिकांची तूफान गर्दी झाली होती. चाहत्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे 'स्त्री २' बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. अवघ्या ४ ते ५ दिवसात या चित्रपटाने २५० कोटींचा आकडा पार केला. 'स्त्री २' या चित्रपटाचा बॉलिवूडमधील टॉप १० च्या यादीमध्ये समावेश झालाय. हा चित्रपट अवघ्या ५० कोटींमध्ये बनवण्यात आल्याची माहिती निर्मात्याने दिली होती.

चित्रपटाच्या निर्मितीला लागणारा खर्च बघता चित्रपटानं दुप्पट कमाई केल्याचं दिसत आहे. श्रद्धा कपूरच्या स्त्री २ या चित्रपटाने अक्षय कुमारच्या 'खेल खेल में' आणि जॉन अब्राहमचा 'वेदा' या चित्रपटांना मागे टाकलं आहे. चित्रपटामधील कलाकारांच्या कॉमेडीमुळे प्रेक्षक खळखळून हसत आहेत.

Edited By : Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT