Stree 2 Box Office Collection Day 11 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Stree 2 Box Office Collection Day 11 : श्रद्धाच्या 'स्त्री २' ने पार केला ४०० कोटींचा आकडा; रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यातच केली तगडी कमाई

Stree 2 Box Office Collection : स्त्री 2 ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई सुरु आहे. या चित्रपटाने 11 व्या दिवशी देखील प्रचंड नफा मिळवला आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या स्त्री 2ने वीकेंडमध्ये मोठी झेप घेतली आहे. 11व्या दिवशी Stree 2 ने किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घ्या.

Shreya Maskar

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्त्री 2 बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर कामगिरी करत आहे. अमर कौशिक दिग्दर्शित हा चित्रपट आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच जबरदस्त कलेक्शनला सुरुवात केली होती. आता आपण स्त्री 2 च्या 11व्या दिवशी किती कमाई जाणून घेऊयात.

'स्त्री 2' ची 11 दिवसाची छप्परफाड कमाई

स्त्री 2 (Stree 2) हा हॉरर-कॉमेडी चित्रपट 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आजवर प्रचंड नफा कमावला आहे. यासोबतच स्त्री 2 हा 2024चा सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. गेल्या शनिवारी ३० कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या स्त्री २ ने रविवारी छप्परफाड कलेक्शन केले आहे. 10 व्या दिवसाच्या तुलनेत 11 व्या दिवशी व्यवसायात जवळपास 100 टक्के वाढ झाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, स्त्री 2 ने रिलीजच्या दुसऱ्या रविवारी 40 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्याची 11व्या दिवसाची ही छप्परफाड कमाई आहे. आता स्त्री 2 ने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) 400 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. स्त्री2 च्या बंपर कलेक्शनची कामगिरी पाहता श्रद्धा कपूर (shraddha kapoor) आणि राजकुमार राव (rajkummar rao) यांचा हा चित्रपट भविष्यात आणखी चमत्कार घडवेल असे म्हणता येईल.

'स्त्री 2' चं 11 दिवसांच बॉक्स ऑफिस कलेक्श

पहिला दिवस - 64.80 कोटी

दुसरा दिवस - 35.30 कोटी

तिसरा दिवस - 45.70 कोटी

चौथा दिवस - 58.20 कोटी

पाचवा दिवस - 38.40 कोटी

सहावा दिवस - 26.80 कोटी

सातवा दिवस - 20.40 कोटी

आठवा दिवस - 18.20 कोटी

नववा दिवस - 19.33 कोटी

दहावा दिवस - 33.80 कोटी

अकरावा दिवस - 40 कोटी

आतापर्यंत - एकूण 400 कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT