Rajkummar Rao SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rajkummar Rao : 'स्त्री 2' च्या यशानंतर राजकुमार राव पत्नीसोबत पोहचला इस्कॉन मंदिरात, श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन; पाहा PHOTO

Rajkummar Rao celebrates Janmashtami : स्त्री 2 अभिनेता राजकुमार रावने जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. यंदाची जन्माष्टमी राजकुमारसाठी खूप खास आहे. कारण 'स्त्री २' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

Shreya Maskar

देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन होऊन बाळकृष्णाची सेवा करत आहे आणि आशीर्वाद घेत आहेत. अनेक भक्तजण श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन कृष्ण भक्ती करत आहेत. अशात अभिनेता राजकुमार राव देखील कृष्ण मंदिरात दर्शनाला गेला होता.

राजकुमार रावचा 'स्त्री २' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या यशानंतर राजकुमार राव इस्कॉन मंदिरात गेला. त्यांनी याबाबत ची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

यंदाची जन्माष्टमी राजकुमार रावसाठी खूप खास आहे कारण त्याचा चित्रपट 2 बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. चित्रपटाने जगभरातील थिएटरमध्ये 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. राजकुमार राव यांनी हा आनंदाचा क्षण पत्नीसोबत इस्कॉन मंदिरात जाऊन तो साजरा केला. जन्माष्टमीच्या निमित्ताने राजकुमार राव यांनी पत्नी पत्रलेखासोबत इस्कॉन मंदिराला भेट दिली आणि त्याचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

राजकुमार राव पत्नीसोबत इस्कॉन मंदिरात दर्शनासाठी पोहोचला

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने (Rajkummar Rao) इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो श्रीकृष्णाला स्नान घालताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, 'आमच्याकडून तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा!' या फोटोमध्ये राजकुमार राव पत्नी पत्रलेखासोबत दिसत आहे. राजकुमार राव पत्नी पत्रलेखासोबत मुंबईतील इस्कॉन मंदिरात (iskcon temple) काल गेला होता. दोघही श्रीकृष्ण भक्तीत तल्लीन झालेले पाहायला मिळत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

'स्त्री 2' 500 कोटीचा टप्पा पार

अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भन्नाट कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. 'स्त्री 2' ने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन 12 दिवस झाले आहेत. या दिवसात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींहून अधिकचे जगभरात कलेक्शन केले आहे. स्त्री हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

'स्त्री 2' ची स्टार कास्ट

राजकुमार राव व्यतिरिक्त श्रद्धा कपूर, अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना यांनी स्त्री 2 चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Sabudana Laddu Recipe: श्रावणात उपवासाला झटपट बनवा 'साबुदाणा लाडू', ही रेसिपी एकदा वाचाच

Numerology Success: 'या' जन्मतारखेच्या लोकांचे बालपण संघर्षमय, पण पुढे आयुष्य बदलून टाकणारी श्रीमंती

Pune Rave Party: मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीत राजकीय कनेक्शन उघड, बड्या महिला नेत्याचा पती पोलिसांच्या ताब्यात

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT