Vachan Dile Tu Mala Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vachan Dile Tu Mala: वचन दिले तू मला! 'स्टार प्रवाह'वर सुरू होणार नवी मालिका; छोट्या पडद्यावर रंगणार कोर्टरुम ड्रामा, पाहा प्रोमो

Vachan Dile Tu Mala: स्टार प्रवाहची नवीन मालिका ‘वचन दिले तू मला’ १५ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अनुष्का सरकाटे आणि इंद्रनील कामत यांच्या प्रमुख भूमिका दिसणार आहेत.

Shruti Vilas Kadam

Vachan Dile Tu Mala: मराठी मालिका विश्वात नव्या मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. स्टार प्रवाहची नवी मालिका ‘वचन दिले तू मला’चा पहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत अनुष्का सरकाटे आणि इंद्रनील कामत ही नवी जोडी प्रथमच एकत्र दिसणार आहे.

प्रोमोनुसार, ही मालिका एका ठाम, हिम्मतवान आणि न्यायासाठी लढणाऱ्या मुलीची कथा सांगते. मालिकेतील मुख्य पात्र ऊर्जा आपल्या गावातील एका गंभीर घटनेचा न्याय मिळवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाते. मात्र तिथे तिला कोणीही दाद देत नाही. तेव्हा ती ठामपणे विचारते, “साहेब, जर ही मुलगी तुमची असती तर?” या प्रश्नानंतर तिची तक्रार नोंदवली जाते, पण प्रकरण कोर्टात गेल्यावर तिच्यासमोर अनेक आव्हाने उभी राहणार अशी धमकी या मालिकेचा खलनायका तिला देतो.

या मालिकेत ऊर्जाची भूमिका अभिनेत्री अनुष्का सरकाटे साकारत आहे. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांमध्ये वेगळी छाप सोडली आहे. तर नायकाच्या भूमिकेत इंद्रनील कामत झळकणार असून, त्यांच्या या नवीन जोडीबद्दल सोशल मीडियावर उत्सुकता वाढली आहे. याशिवाय मालिकेत अनुभवी अभिनेता मिलिंद गवळी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

स्टार प्रवाहने दिलेल्या माहितीनुसार, ‘वचन दिले तू मला’ ही नवी मालिका १५ डिसेंबर २०२५ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता प्रसारित होणार आहे. समाजातील सत्य, न्याय, संघर्ष आणि नात्यांची नवी बाजू मांडणारी ही कथा प्रेक्षकांना भावेल का? अशी चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Politics:शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; कुटुंबियाचा आरोप,राजकारण तापलं

T20 World Cup: बांगलादेश आऊट! टी-२० विश्वचषकात खेळण्यास नकार

बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती कोटींची गुंतवणूक आली? मुख्यमंत्र्यांनी सांगितला आकडा

Friday Horoscope : जुन्या कर्जापासून मुक्त होणार, प्रेमात यश मिळणार;५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

SCROLL FOR NEXT