Nashibvaan Marathi Serial SAAM TV
मनोरंजन बातम्या

Nashibvaan Marathi Serial : तारीख ठरली! 'नशीबवान' मालिका 'या' दिवशी होणार सुरू, वेळ आताच नोट करा

Nashibvaan Release Date : स्टार प्रवाह वाहिनीवरील नवीन मालिका 'नशीबवान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

Shreya Maskar

स्टार प्रवाह वाहिनीवर 'नशीबवान' मालिका सुरू होत आहे.

'नशीबवान' मालिकेची रिलीज डेट आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे.

मालिकेत मराठमोळा अभिनेता अजय पूरकर झळकणार आहे.

प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नवीन मालिका सज्ज आहेत. अलिकडेच स्टार प्रवाह वाहिनीने दोन नवीन मालिकांची घोषणा केली होती. पहिली 'लपंडाव' आणि दुसरी 'नशीबवान' (Nashibvaan ) या दोन्ही मालिकांचे प्रोमो खूपच भारी आहेत. आता 'नशीबवान' मालिकेची रिलीज डेट आणि वेळ समोर आली आहे. याची खास पोस्ट करण्यात आली आहे.

'नशीबवान' रिलीज डेट

'नशीबवान' मालिका 15 सप्टेंबरपासून सुरू होणार असून सोमवार ते शुक्रवार रात्री 9:00 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहता येणार आहे. चाहते मालिका पाहण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे. तर 'लपंडाव' ही मालिक देखील 15 सप्टेंबरपासून दुपारी 2:00 वाजता पाहायला मिळणार आहे.

कोणती मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

'नशीबवान' मालिका 9:00 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या 9:00 वाजता 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही शिवानी सुर्वेची मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यामुळे 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिका संपणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

'नशीबवान' मालिका

'नशीबवान' मालिकेत लोकप्रिय मराठी अभिनेता अजय पूरकर (Ajay Poorkar) आणि अभिनेत्री नेहा नाईक मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. नेहा नाईकच्या पात्राचे नाव गिरीजा असे आहे. तसेच अभिनेत्री प्राजक्ता केळकर देखील मालिकेचा भाग आहे. मालिकेत अजय पूरकर खलनायकाची भूमिका साकारणार आहे. नागेश्वर घोरपडे हे त्याच्या पात्राचे नाव आहे. मालिकेत अजय पूरकर यांचे खतरनाक रुप पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

तळलेले की उकडीचे? गणपतीच्या नैवेद्यासाठी कोणते मोदक बेस्ट, जाणून घ्या

आमच्या जवळच्या लोकांवर चौकशा का? जरांगेंचा सरकारवर निशाणा; ED च्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा

Health Tips: रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या 'या' मसाल्याचं पाणी; फायदे वाचून व्हाल थक्क!

Vijay-Trisha Viral Video: अजित कुमारच्या रेसिंग इव्हेंटमध्ये CM विजय आणि तृषा कृष्णन एकत्र; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT