Muramba Upcoming Twist Saam Tv
मनोरंजन बातम्या

Muramba Serial: रमा करणार आरोहीची इच्छा पूर्ण? 'मुरांबा' मालिकेत पुन्हा येणार नवा ट्विस्ट

Muramba Upcoming Twist: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'मुरांबा'ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे. या मालिकेत दररोज येणारे नवे वळण, नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

Shruti Vilas Kadam

Muramba Serial: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'मुरांबा'ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे. या मालिकेत दररोज येणारे नवे वळण, नवे ट्विस्ट आणि पात्रांमधील नात्यांची गुंतागुंत यामुळे प्रेक्षक कायम उत्सुक असतात. सध्या गणेशोत्सवाचे औचित्य साधत मालिकेत एक नवे भावनिक वळण दाखवले जात आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये दाखवले आहे की, आरोहीला आपल्या घरात बाप्पाची स्थापना व्हावी असे मनापासून वाटते. ती अक्षयला विचारते की आपण गणपती आणणार का? मात्र अक्षय तिच्या अपेक्षेप्रमाणे उत्तर न देता स्पष्ट नकार देतो. यामुळे आरोही हताश होते. तिच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती गणपतीसमोर प्रार्थना करते, “बाप्पा, माझ्या आईला घेऊन ये.” हा क्षण अत्यंत भावनिक असून प्रेक्षकांची मने पिळवटून टाकतो.

आरोहीच्या या शब्दांनी रमा मनोमन हेलावून जाते. आरोहीचे दुःख आणि तिची अपूर्ण इच्छा पाहून रमा ठरवते की, काहीही झाले तरी आरोहीला गणपतीच्या आगमनाचा आनंद मिळायला हवा. आणि मग ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत रमा गणपतीची मूर्ती घेऊन घरात प्रवेश करते. तिच्या या आगमनाने आरोहीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. ती धावत रमाकडे जाते आणि बाप्पाचे स्वागत करते.

परंतु या आनंदी प्रसंगामध्ये एक वेगळीच तणावाची छटा दिसते. आरोही आनंदाने न्हाऊन निघाली असताना अक्षय आणि इतर घरच्यांच्या चेहऱ्यावर मात्र चिंता स्पष्ट दिसते. बाप्पाचे आगमन आनंद देऊन जाते, परंतु त्याचबरोबर घरात नवे वादळ उभे राहण्याची शक्यता निर्माण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय मुलाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांकडून रास्ता रोको करत फोडल्या गाड्या

Election Commission: निवडणुकांपूर्वी मतमोजणीच्या नियमात मोठा बदल; EVMच्या आधी पोस्टल बॅलेटची होणार मोजणी

IND vs WI: भारताच्या पाच खेळाडूंची कसोटी कारकीर्द संपुष्टात! विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी संघाच्या घोषणेतून स्पष्ट संकेत

Maharashtra Live News Update: बीडमध्ये उद्धव ठाकरेंचा पाहणी दौरा; शेतकऱ्यांचा संवाद

Beed Rain : बीडला अतिवृष्टीचा तडाखा, तब्बल चार एकर जमीन गेली वाहून| VIDEO

SCROLL FOR NEXT