Tharala Tar Mag saam tv
मनोरंजन बातम्या

Tharala Tar Mag : अर्जुन-सायलीसमोर येणार 22 वर्षांपूर्वीच्या अपघाताचं सत्य; नागराजचा खेळ संपला, सुमन करणार नवऱ्याचा पर्दाफाश| VIDEO

Tharala Tar Mag Update : 'ठरलं तर मग' मालिकेत अखेर नागराजचे सत्य सायली-अर्जुनसमोर येणार आहे. नागराज आपल्या गुन्ह्याची स्वतः कबुली देतो. मालिकेत नेमकं काय घडतंय, जाणून घ्या.

Shreya Maskar

'ठरलं तर मग' मालिकेत 22 वर्षांपूर्वीच्या अपघाताचं सत्य अर्जुन-सायली शोधत आहे.

सुमन हुशारीने नागराजचे खोटे अर्जुन-सायली समोर घेऊन येते.

नागराज आपल्या गुन्ह्याची कबुली देतो.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' सध्या निर्णायक वळणावर पाहायला मिळत आहे. एका मागोमाग एक मोठे खुलासे होताना दिसत आहेत. सर्व प्रथम विलासचा खूण कोणी केला हे समजते. त्यानंतर प्रियाचे सत्य समोर येते. महिपतला पोलीस अटक करतात. तर दुसरीकडे सचिन-साक्षीचे सत्य देखील लवकरच उघड होणार आहे. मात्र सध्या मालिकेत सुमन काकीचा शोध पाहायला मिळत आहे. सुमन काकीचा अर्जुन-सायली शोध घेतात. आता लवकरच रविराजच्या अपघातचे सत्य समोर येताना दिसणार आहे.

'ठरलं तर मग'च्या नवीन प्रोमोमध्ये सुमन काकी खूप हुशारीने नागराजचे सत्य सायली आणि अर्जुनला सांगताना दिसत आहे. 22 वर्षांपूर्वी नागराजनेच रविराज आणि प्रतिमाच्या अपघात घडवून आणल्याचे तो सुमन समोर बोलतो. जे सुमन सर्व रेकॉर्ड करते. सुमन नागराजनेच तिला किडनॅप केले असल्याचे अर्जुन-सायलीला सांगते. त्यानंतर तिघं मिळून प्लान करतात की, सुमनला डोक्यावर परिणाम झाला आहे. जेणेकरून नागराज चूक करेल, तेव्हा सायली आणि अर्जुन त्याला पकडतील आणि शेवटी तसेच होते.

प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, नागराज सुमनला बोलतो की, "मीच आहे तो खरा मास्टर माइंड...22 वर्षांपूर्वी रविराज आणि प्रतिमाचा अपघात मीच घडवून आणला होता. जा कोणाला सांगायचं ते सांग. पण, तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार? मी तर आधीच सांगितले आहे की, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय सुमन..."

सुमन हुशारीने मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि अर्जुनला पाठवते. अर्जुन-सायली हे सर्व पाहतात आणि त्यांना मोठा धक्का बसतो. अर्जुनचा तर प्रचंड संताप होतो. आता अर्जुन हुशारीने नागराजला अडकवणार आहे आणि त्याला आपल्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणार आहे. त्यामुळे 'ठरलं तर मग'चे आगामी एपिसोड खूपच मनोरंजक असणार आहे. तसेच नागराजचे सत्य रविराजला समजताच तो काय करतो, हे देखील पाहायला प्रेक्षक आतुर आहेत. 'ठरलं तर मग' मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर संध्याकाळी 8.30 वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! अंत्यसंस्कारानंतर आजींच्या अस्थी गेल्या कुठे? नातेवाईकांची पोलीस ठाण्यात धाव, मग झाला मोठा खुलासा

Travel With Baby : लहान मुलांसोबत पहिलीच ट्रिप प्लान करताय? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवाच

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये 34 नगरसेवकांना घेऊन काँग्रेसने आपला गट स्थापन केला

Sneezing : सतत येणाऱ्या शिंकांनी हैराण झालात? मग 'हे' उपाय एकदा करून पाहाच, मिनिटांत मिळेल आराम

Sunita Ahuja: 'तो नेहमीच शुगर डॅडी शोधण्याऱ्या मुलींच्या चक्करमध्ये...'; गोविंदाबद्दल पत्नी सुनीताचा पुन्हा एक धक्कादायक आरोप

SCROLL FOR NEXT