Yad Lagla Premacha Serial  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Yad Lagla Premacha: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मराठी बिग बॉस फेम अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका

Latest Marathi Serial Update: स्टार प्रवाहवर २७ मे पासून एक नवी मालिका सुरु होणार आसून जय दुधाने, विशाल निकम आणि पूजा बिरारी हे तिघ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'बिग बॉस मराठी' या मराठी रिॲलिटी शोच्या माध्यनातून जय दुधाने घराघरात प्रसिद्ध झाला. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्यापर्वात जय टॉप ३ फायनलिस्टपैकी एक होता. बिग बॉस मराठीपूर्वी जयने एमटीव्हीवरील सुप्रसिद्ध रिॲलिटी शो स्प्लिट्सविलामध्ये देखील त्याने सहभाग घेतला होता. जय स्प्लिट्सविला या रिॲलिटी शोच विजेता ठरला होता. जय त्याच्या हटके आणि स्टायलिश लूक्सना घेऊन देखील चर्चेत असतो. आता जयच्या चाहत्यांना त्याला दररोज पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाहवर २७ मे पासून एक नवी मालिका सुरु होणार आहे. त्या मालिकेचं नाव 'येड लागलं प्रेमाचं' असं असून प्रेक्षकांना जयला दररोज पहायला मिळेल. या मालिकेची उत्सुक्ता प्रेक्षकांच्या मनात प्रोमो बघूनच पहायला मिळत्ये.

मालिकेच्या प्रोमोमध्ये राया आणि मंजिरी म्हणजेच अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी पाहायला मिळत आहे. लवकरच मालिकेतलं आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजेच इन्स्पेक्टर जय घोरपडे प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यचे कळत आहे.

जय त्याच्या कामात अत्यंत हुशार आणि मेहनती पण त्याला लोकांकडून लाच घेण्याची सवय असते. सर्व गावात त्याचा दबदबा पहायला मिळतो. तो लोकांसमोर मी कसा जनतेसाठी काम करतो असं दाखवत असतो. मात्र काही स्वार्था शिवाय जय कोणाची मदत करत नाही.

जय घोरपडे ही भूमिका आपला सर्वांचा लाडका जय दुधाने साकारणार आहे. अभिनेता जय दुधाणे या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पोलिसाची व्यक्तिरेखा साकारणार दिसणार आहे. शूटिंगच्या अनुभवाविषयी सांगताना जय म्हणाला ''मी पहिल्यांदाच पोलिस इन्सपेक्टरची भूमिका साकारत आहे. माझे काका पोलीस खात्यात होते. त्यामुळे त्यांचं चांगलं मार्गदर्शन मिळत आहे. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही. व्यायाम करणं माझा पॅशन आहे आणि या भूमिकेसाठी शरीरयष्ठीवर जास्त मेहतनघ्यावी लागत आहे.''

पुढे तो म्हणाला की त्याने या आधी विशाल सोबत काम केलं आहे त्यामुळे त्या दोघांची चांगली ओळख होती. या मालिकेच्या शूटिंग दरम्याण त्याची पूजासोबत देखील छान मैत्री पहायला मिळाली आहे. आता हे तीघ मिळून मालिकेमध्ये नेमकं काय करणार हे पहामं रंजक ठरेल. महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी स्टार प्रवाह सोबत काम करताना माला खूप आवडत आहे. मालिकेच्या मध्यमातून परत एकदा घराघरात जय पोहचणार आहे. आता 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळेल का थोड्याच दिवसात कळेल.

Edited By- Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, आरपीआयची मागणी

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT