Karthik Kumar And Suchitra News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Karthik Kumar And Suchitra News : 'तो गे आहे...', गायिकेने घटस्फोटाच्या ७ वर्षांनंतर आधीच्या नवऱ्याबद्दल केला धक्कादायक दावा

Karthik Kumar And Suchitra : सिंगर सुचित्राने अभिनेता कार्तिक कुमारवर घटस्फोटाच्या ७ वर्षांनंतर 'गे' असल्याचा गंभीर आरोप केला आहे. कार्तिकने तिच्या आरोपांवर इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर दिलेले आहे.

Chetan Bodke

फिल्म इंडस्ट्रीमध्ये सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपचं ब्रेकअप पॅचअपचं वृ्त्त हमखास पाहतो. सेलिब्रिटींसाठी ही बातमी काही वेगळी नाही. असे अनेक सेलिब्रिटी कपल आहे, जे ब्रेकअप झाल्यानंतर एकमेकांसोबत बोलण्याचं तर दूर ते एकमेकांकडे पाहतही नाहीत. अशातच सध्या एक टॉलिवूड इंडस्ट्रीतील कपल चर्चेत आले आहे.

स्टँडअप कॉमेडियन- अभिनेता कार्तिक कुमार आणि त्याची एक्स वाईफ सिंगर सुचित्रा यांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर ७ वर्षांनी सुचित्राने कार्तिकवर गे असल्याचा गंभीर आरोप केला आहे. कार्तिकने तिच्या आरोपांवर इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर दिलेले आहे.

कार्तिक कुमार इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत म्हणतो की, "मी होमोसेक्शुअल आहे की नाही... जर मी असेल तर मला त्या गोष्टीची लाज वाटणार नाही. सेक्शुअलिटीसाठी जितके काही स्पेक्ट्रम आहेत त्यातील एक जरी असला तरी मला त्याचा अभिमान वाटेल. त्याची मला लाज वाटणार नाही, उलट मला आनंद वाटेल. मी शहरातल्या प्राइड रॅलीमध्ये सहभाग घेईल. सर्व प्रकारच्या सेक्शुअलिटी प्राइड रॅलीत सहभागी होईल. यात लाज वाटण्याची कोणतीही गोष्ट नाही तर उलट गर्वाची गोष्ट आहे."

पण कार्तिकने व्हिडीओमध्ये सुचित्राला थेट टार्गेट करण्याऐवजी वेगळ्या पद्धतीनं तिला प्रत्युत्तर दिलं आहे. LGBTQA+ समुदायाला कार्तिकने पाठिंबा दिल्यामुळे चाहत्यांकडून त्याचे कौतुक केले जात आहे.

कार्तिक कुमारची दुसरी पत्नी अमृता श्रीनिवासननेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. सुचित्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कार्तिक गे आहे. त्याचे आणि धनुषचे काही संबंध आहेत. सोबतच अमृताने त्याच्यासोबत लग्न करुन मोठी चूक केल्याचं तिने म्हटलं.

कार्तिक आणि सुचित्राचे २००७ मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या ठिक १० वर्षांनंतर म्हणजेच २०१७ मध्ये त्यांनी अधिकृतरित्या घटस्फोट घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Sanjay Dutt : बॉलिवूडचा मुन्नाभाई किती कोटींचा मालक?

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

SCROLL FOR NEXT