RRR Japan Box Office Collection Saam TV
मनोरंजन बातम्या

RRR In Japan: ऑस्कर गाजवल्यावर ‘RRR’ चा जपानमध्येही डंका, बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई

‘नाटू- नाटू’ या गाण्याला ‘सर्वोत्कृष्ट मुळ गाणं’या साठी पुरस्कार मिळाल्यानंतर आता ‘RRR’ चित्रपटानं जपान (Japan) मध्ये तेथील बॉक्स ऑफिसवर आपला डंका वाजवला आहे.

Chetan Bodke

RRR Japan Box Office Collection: एस एस राजामौली दिग्दर्शित ‘RRR’चित्रपटाची हवा आजही जगभरात कायम आहे, नुकत्याच गेल्या काही दिवसांपुर्वी चित्रपटातील ‘नाटू- नाटू’ या गाण्याला ‘सर्वोत्कृष्ट मुळ गाणं’या साठी पुरस्कार मिळाल्यानंतर सिनेमाची चांगलीच हवा सर्वत्र होत आहे. आता ‘RRR’ या चित्रपटानं जपान (Japan) मध्ये तेथील बॉक्स ऑफिसवर आपला डंका वाजवला आहे.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘RRR’ सिनेमा सध्या जपानमधील थिएटरमध्ये आपली हवा करत आहे. चित्रपट रोज नवनवी रेकॉर्डब्रेक करत आपल्या नावावर नवीन रेकॉर्ड बनवत आहे. अशातच हा चित्रपट जपानमध्ये १ मिलियनहून अधिक फूटफॉल्स नोंदवणारा पहिला भारतीय चित्रपट बनला असून हा चित्रपट जपानमधील ४४ शहरे आणि प्रांतांमध्ये २०९ स्क्रीन्स आणि ३१ IMAX स्क्रीनवर रिलीज झालेला पहिला भारतीय चित्रपट ठरला.

दरम्यान, निर्मात्यांनी ‘RRR’ च्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी जपानमधील कमाईबाबत माहिती दिली आहे. चित्रपटाने त्याच्या थिएटर रनच्या १६४ दिवसांत १ मिलियन प्रेक्षकांची नोंद केली आहे. या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की ‘RRR’ ने १६४ दिवसांत १ मिलियन + फुटफॉल रेकॉर्ड करत आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे. भारतानंतर चित्रपटाने जपानमध्ये ही आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याने सध्या सर्वत्र चित्रपटाचे कौतुक होत आहे.

‘RRR’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली यांनी ट्वीटरवर आपल्या चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल जपानी प्रेक्षकांचे आभार मानले. दिग्दर्शक राजामौली ट्विट करत म्हणतात, ‘जपानमधील प्रेक्षकांकडून 1 मिलियन हग्स. अरिगेटो गुजैमासु #RRRInJapan.’ दरम्यान, बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, ‘RRR’ चित्रपटाने जपानमध्ये आतापर्यंत 80 कोटींहून अधिक कमाई केली असल्याची अपेक्षा आहे. हा चित्रपट लवकरच जपानमध्ये १०० कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज लावला जात आहे.

या चित्रपटाने जानेवारी महिन्यात जपानमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन १०० दिवस पूर्ण केले आहेत. ‘RRR’ला भारत, जपानसह पाश्चात्य देशांमध्येही खूप पसंती मिळाली आहे. गेल्या महिन्यात, एसएस राजामौली दिग्दर्शित ‘नाटू- नाटू’ या गाण्याने ‘सर्वोत्कृष्ट मुळ गाणं’च्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार जिंकून संपूर्ण देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT