Aryan Khan: SRK च्या मॅनेजरची गाडी CCTV मध्ये कैद, पोलिसांच्या हाती महत्त्वाचं फूटेज Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aryan Khan: SRK च्या मॅनेजरची गाडी CCTV मध्ये कैद, पोलिसांच्या हाती महत्त्वाचं फूटेज

शाहरुख खानची मॅनेजर पुजा ददलानीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अभिनेता शाहरुख खान Shah Rukh Khan मुलगा आर्यन खानशी Aryan Khan संबंधिमध्ये ड्रग्ज प्रकरणात 25 कोटी रुपायांची खंडणी मागितल्याचा आरोप एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे Sameer Wankhede यांच्यावर करण्यात आला आहे. आता या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाला चांगले यश आले आहे. शाहरुख खानची मॅनेजर पुजा ददलानीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. यामुळे या प्रकरणात खंडणीचा गौप्यस्फोट करणाऱ्या प्रभाकर साईलने उघड केलेल्या माहितीला कुठेतरी दुजोरा मिळणार आहे. मुंबई पोलीस लवकरच या प्रकरणाचा आता गुन्ह्याची नोंद करणार असल्याचे सांगितले जात आहे.

हे देखील पहा-

आर्यन खानला सोडवण्याकरिता मुंबई मधील लोअर परळ या भागात 25 कोटी रुपयांचे डील झाल्याचा आरोप प्रभाकर साईल याने केला होता. पोलिसांनी याप्रकरणी संबंधित भागात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये हा धक्कादायक फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. यामध्ये मुंबईच्या लोअर परळमध्ये पुजा ददलानीची निळ्या रंगाची मर्सिडिज कार दिसून आलेली आहे. मुंबई पोलीस आता या पुराव्याच्या जोरावर पुजा ददलानी आणि आर्यन खानचा जबाब नोंदविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई मधील क्रूझ पार्टीवर ड्रग्ज प्रकरणामध्ये पंच असलेल्या प्रभाकर साईल याने पुढे येत एनसीबी, किरण गोसावीवर खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये प्रभाकर साईल याने आर्यन खानला सोडवण्याकरिता 25 कोटी रुपयांची डील झाली होती. यामध्ये 8 कोटी समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असे किरण गोसावी सॅम डिसोजा याला सांगत असल्याचे आपण ऐकले होते, असा गौप्यस्फोट प्रभाकर साईल याने केला होता. पोलिसांनी याप्रकरणाच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. लोअर परळ भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ; आधी ४२०ची केस आता घर आणि रेस्टॉरंटवर इनकम टॅक्सचा छापा, पण...

Maharashtra : राष्ट्रवादीसोडून १४ जण भाजपच्या वाट्यावर, यादी पाहून अजित पवार नाराज; मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत

Special Railway Trains: ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त १३८ स्पेशल ट्रेन, ६५० फेऱ्या; रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा हप्ता लांबणीवर जाणार; जानेवारीत खात्यात ₹४५०० जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT