इंडियन प्रीमियर लीगमधील सनराइजर्स हैदराबादचा खेळाडू अभिषेक शर्मा मोठ्या वादात अडकला आहे. सूरतची प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंह आत्महत्या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. (Latest Marathi News)
मीडिया रिपोर्टनुसार, २३ वर्षांच्या अभिषेक शर्माला मॉडेल तानिया सिंहने शेवटचा कॉल केला होता. यामुळे पोलिसांनी अभिषेक शर्माची चौकशी सुरु केली आहे.
२८ वर्षांची तानिया फॅशन डिझाइनिंग आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करत होती. इन्स्टाग्रामवर तिचे १०,००० हून अधिक फॉलोवर्स होते. इन्स्टाग्रामच्या तिच्या बायोमध्ये डिस्क जॉक, मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल लिहिललं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तानियाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी तपास सुरु केली आहे. या प्रकरणात आयपीएलच्या हैदराबादचा संघाचा खेळाडू अभिषेक शर्माचं नाव समोर आलं आहे. पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं आहे की, अभिषेक शर्मा हा तानिया सिंहच्या संपर्कात असल्याचे समोर आलं आहे. त्याचबरोबर अशीही बाब समोर आली आहे की, मध्यंतरी अभिषेक आणि तानियाचा संपर्कात नव्हते.मात्र, दोघेही मित्र असल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली.
मॉडेल तानियाला काल उशीरा रात्री घरी परतली. त्यानंतर घरी परतल्यानंतर जीवन संपवलं. मॉडेल तानियाचा मृतदेह पाहून तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला.
या प्रकरणी पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसर, तानियाच्या कॉल डिटेलमधून अनेक बाबी उघडकीस होण्याची शक्यता आहे. तसेच तानियाने शेवटचा कॉल अभिषेक शर्माला केला होता. त्यामुळे पोलिसांकडून प्रेम प्रकरणाच्या अँगलमधून तपास सुरु केला आहे.
२८ वर्षांची मॉडेल तानियाने काल आत्महत्या केली. ती गेल्या दोन ते दीड वर्षांपासून फॅशन डिझाइनिंग आणि मॉडेलिंगचा अभ्यास करत होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
अभिषेक शर्मा हा सनराइजर्स हैदराबाद संघाचा खेळाडू आहे. तो अष्टपैलू खेळाडू आहे. आयपीएलच्या ४७ सामन्यात १३७.३८ च्या स्ट्राइक रेटने ८९३ धावा केल्या आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या ७५ इतकी आहे. आयपीएलमध्ये त्याने ४ अर्धशतक लगावले आहेत. तर ९ विकेट घेतले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.