जगातील सर्वात मोठी लीग स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल २०२४ (IPL 2024) स्पर्धेची तारीख समोर आली आहे. या स्पर्धेच्या आगामी हंगामाला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ही स्पर्धा केव्हा सुरु होणार याबाबत तर्क वितर्क लावले जात होते. अखेर आयपीएल स्पर्धेचे चेअरमन अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांनी या स्पर्धेची तारीख सांगितली आहे.
दरवर्षी स्पर्धा सुरु होण्याच्या काही दिवसांपूर्वीच स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं जातं. मात्र यावर्षी भारतात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचा विचार करुन ही तारीख ठरवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुका असल्या तरीदेखील या स्पर्धेचे आयोजन भारतात केलं जाणार असल्याचं जवळजवळ स्पष्ट झालं आहे. यापूर्वी २००९ आणि २०१४ आयपीएल स्पर्धेवेळीही भारतात लोकसभा निवडणुका होत्या. त्यावेळी या स्पर्धेचे आयोजन भारताबाहेर करण्यात आले होते.
यापूर्वी २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकांदरम्यान आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने या स्पर्धेचे भारतात यशस्वी आयोजन केले होते. यावेळीही भारतात लोकोसभेच्या निवडणुका असताना आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल या स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यावर ठाम आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक निवडणुकांच्या तारखा समोर आल्यानंतर बनवण्यात येईल. कारण आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलला या स्पर्धेचे वेळापत्रक सरकारच्या सहकार्याने बनवावे लागणार आहे. (Cricket news in marathi)
आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आयपीएल २०२४ स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होऊ शकते. आम्ही सरकारी एजन्सीसोबत मिळून काम करत आहोत. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे वेळापत्रक तयार केले जात आहे. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन भारतात केले जाणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.