tor Viral Photo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Viral Photo: प्रसिद्ध अभिनेत्याचे गर्लफ्रेंडसोबतचे खासगी फोटो व्हायरल! संतापून म्हणाला, 'मी त्याला ठार मारेन'

Actor Viral Photo: स्प्लिट्सव्हिला फेम सौरव बेदी डेलनाझ दारूवालासोबतच्या नात्यामुळे ट्रोल झाला. नऊ वर्षांच्या वयाच्या अंतरावरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना त्याने ट्रोलर्सना थेट धमकी दिली.

Shruti Vilas Kadam

Actor Viral Photo: 'स्प्लिट्सव्हिला' फेम अभिनेता आणि मॉडेल सौरव बेदी सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सौरव अभिनेत्री आणि मॉडेल मॅनेजर डेलनाझ दारूवालासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. विशेष म्हणजे, डेलनाझ त्याच्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठी आहे. काही दिवसांपूर्वी सौरवने सोशल मीडियावर डेलनाझसोबतचे खासगी फोटो शेअर करत आपल्या नात्याबद्दल सांगितले. मात्र, हे फोटो समोर आल्यानंतर दोघांनाही मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता या ट्रोलिंगवर सौरवने पहिल्यांदाच उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. ट्रोलर्सना उत्तर देताना त्याने केलेल्या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

डेलनाझसोबतच्या नात्यामुळे सौरव ट्रोल

अलीकडेच सौरव बेदी नयनदीप रक्षितच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने डेलनाझसोबतच्या नात्याबद्दल आणि सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. सौरवने सांगितले की, डेलनाझ आणि माझ्या रिलेशनशिपबद्दल सांगितल्यानंतर अनेक निगेटिव्ह कमेंट्सचा सामना करावा लागला. मात्र, तिच्यासोबतचे खासगी फोटो शेअर केल्याचा मला कोणताही पश्चात्ताप नाही. पण आम्हाला नऊ वर्षांच्या अंतरावरूनही अनेकांनी त्यांना ट्रोल केले.

'एकदा असं बोलून दाखव...' सौरवचा संताप

पॉडकास्टमध्ये सौरवला डेलनाझला मिळणाऱ्या अश्लील आणि आक्षेपार्ह कमेंट्सबद्दल विचारण्यात आले. यावर उत्तर देताना तो म्हणाला, "मी सभ्य लोकांमध्ये आहे. जर एखादा मुलगा माझ्यासमोर येऊन एकदा असं बोलला, तर मी त्याला ठार मारेन." त्याच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. डेलनाझबद्दल केल्या जाणाऱ्या अश्लील कमेंट्सचा राग येतो, हे त्याने स्पष्ट केले.

९ वर्षांच्या वयाच्या अंतरावरही दिलं उत्तर

सौरव आणि डेलनाझ यांच्या वयात नऊ वर्षांचे अंतर आहे. यावर बोलताना सौरव म्हणाला की, आपल्यापेक्षा वयाने मोठ्या महिलेकडे आकर्षित होणारा मी पहिला पुरुष नाही. त्यामुळे केवळ वयातील अंतरावरून दोघांना टार्गेट करणे योग्य नाही. या ट्रोलिंगचा त्यांच्या नात्यावर काही परिणाम होतो का, असे विचारले असता त्याने नकार दिला.

डेलनाझमुळे प्रोजेक्ट्स मिळतात? अभिनेत्याने दिलं उत्तर

डेलनाझ त्याला काम मिळवून देण्यासाठी मदत करते, अशा चर्चांवरही सौरवने प्रतिक्रिया दिली. डेलनाझ त्याला प्रोजेक्ट्स मिळवून देत असेल, तर त्यात चुकीचे काय आहे, असा सवाल त्याने केला. एकूणच, आपल्या नात्याबद्दल आणि ट्रोलिंगबद्दल सौरवने स्पष्ट भूमिका मांडली आहे. मात्र, ट्रोलर्सना दिलेल्या धमकीवजा उत्तरामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केंद्र सरकारचा मोठा विजय! खासदार-आमदारांच्या संख्या वाढीच्या निर्णयाला कट्टर विरोधकाचा पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra News Live Update: इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल होणार

जुने कपडे दान करताय? थांबा! कपडे देण्यापूर्वी जाणून घ्या नियम

दिल्लीमध्ये भाजपची डिनर डिप्लोमसी! डझनभर खासदारांना बोलावलं, पडद्यामागे नेमकं काय शिजतंय?

भाजप कार्यालयावर तुफान दगडफेक, प्रसिद्ध यूट्यूबरच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यानंतर वाद विकोपाला

SCROLL FOR NEXT