Actor Christian Oliver And 2 Daughters Killed In plane Crash Saam Tv
मनोरंजन बातम्या

Christian Oliver Dies: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचा २ मुलींसह विमान अपघातात मृत्यू; समुद्रात कोसळलं विमान, Video

Actor Christian Oliver And 2 Daughters Dies: स्पीड रेसर आणि वाल्किरीसह इतर चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ख्रिश्चियन ओलिवरचा आणि त्याच्या दोन मुलींचा अपघाती मृत्यू झाला आहे.

Chetan Bodke

Actor Christian Oliver And 2 Daughters Killed In plane Crash

हॉलिवूड सिनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. 'स्पीड रेसर' आणि 'वाल्किरी'सह इतर चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ख्रिश्चियन ओलिवरचा आणि त्याच्या दोन मुलींचा अपघाती मृत्यू झाला आहे. गुरुवारी न्यू इयरचं सेलिब्रेशन करुन घरी परतत असताना त्यांचे विमान कॅरेबियन बेटाजवळील समुद्रामध्ये कोसळलं. त्यांच्यासोबत विमानाचा पायलट रॉबर्ट सॅक्स याचाही मृत्यू झाला आहे. (Hollywood)

जर्मन वंशाचा असलेला हॉलिवूड अभिनेता ख्रिश्चियन ऑलिव्हर गुरुवारी (०५ जानेवारी) त्याच्या खासगी विमानाने दोन मुलींसोबत प्रवास करत होता. विमान टेक ऑफनंतर काही वेळातच कॅरेबियन समुद्रात त्यांचे विमान कोसळल्याची बातमी तेथील स्थानिक पोलिसांनी दिली. ५१ वर्षीय ऑलिव्हर, मुलगी मॅडिटा (१० वर्षे) आणि ॲनिक (१२ वर्षे) सोबतच पायलट रॉबर्ट सॅक्स अशी मृतांची नावे आहेत. (Actor)

त्यांच्या अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी, मच्छीमार आणि तटरक्षक ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लगेचच चौघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत. अभिनेत्याचं विमान ग्रेनेडाइन्समधील बेकिया या छोट्या बेटावरून गुरुवारी दुपारी सेंट लुसियाला जात होते. ऑलिव्हर आपल्या दोन्हीही मुलींसोबत नवीन वर्षानिमित्त व्हेकेशनसाठी आला होता, अशी माहिती समोर आली आहे. (Latest News)

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ऑलिव्हरने आपल्या सिनेकारकिर्दित ६० हून अधिक चित्रपट आणि टेलिव्हिजन सीरियलमध्ये केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे आणि त्याच्या दोन मुलींच्या निधनाची वृत्तसमोर आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून नेटकरी श्रद्धांजली वाहत आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

SCROLL FOR NEXT