Rashmika Mandanna-Vijay Deverakonda  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda : रश्मिका अन् विजयची लपूनछपून लंच डेट, पाहा व्हायरल VIDEO

Rashmika Mandanna -Vijay Deverakonda Launch Date: साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना कायम तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

सध्या साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना चांगलीच चर्चेत आहे. तिच्या 'छावा' चित्रपटानंतर ती आता सलमान खानच्या 'सिंकदर'मध्ये झळकली आहे. 'सिंकदर' चित्रपट 30 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. सलमान खान आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna ) पहिल्यांदाच एकत्र चित्रपटात पाहायला मिळाले आहे. अशात आता रश्मिका मंदाना एका वेगळ्या कारणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रश्मिकाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये ती एका रेस्टॉरंट बाहेर स्पॉट झाली आहे. रश्मिका कायम तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. खूप वेळापासून रश्मिकाचे नाव साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत (Vijay Deverakonda) जोडले जात आहे. ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे. अशात आता 'छावा' च्या यशानंतर आणि 'सिकंदर'च्या रिलीजनंतर रश्मिका मंदाना विजय देवरकोंडाबरोबर पाहायला मिळाली आहे. त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये रश्मिका मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसली. तेव्हा विजय देवरकोंडा देखील मागून रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसला. रेस्टॉरंटमध्ये यांची लंच डेट प्लान होती. मात्र या डेटला दोघेही वेगवेगळे पोहचले. रश्मिकाने तोंडाला मास्क लावले होते. रश्मिकाने नंतर पापाराझींसाठी पोज दिली. मात्र विजय देवरकोंडा तोंडाला मास्क लावून निघून गेला. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

लंच डेटसाठी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना दोघेही कूल लूकमध्ये पाहायला मिळाले. रश्मिकाने क्रॉप टॉप आणि जीन्स परिधान केली होती. तर विजयने प्रिंटेड व्हाइट शर्ट आणि पॅन्ट परिधान केली होती. दोघांनीही कॅप घातली होती. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लंच डेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे यांच्या नात्यांच्या चर्चांना आता उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT