Thalapathy Vijay On CAA Saam Tv
मनोरंजन बातम्या

अशा कायद्याची गरज काय?, CAA ला विरोध करत साऊथ सुपरस्टार Thalapathy Vijayचा केंद्र सरकारला सवाल

Citizenship Amendment Act: एकीकडे या कायद्याच्या अंमलबजावणीचा आनंद साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे या कायद्याला अनेक राजकीय पक्षांनी विरोध करत मोदी सरकारला कोंडीमध्ये पाडण्याचा प्रयत्न केला आहे.

Priya More

Thalapathy Vijay On CAA:

मोदी सरकारने (Modi Government) देशामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा (Citizenship Amendment Act) म्हणजेचे सीएए (CAA) लागू केले आहे. या कायद्यानुसार भारताच्या शेजारच्या तीन देशांमधील अल्पसंख्यांना नागरिकत्व मिळणार आहे. एकीकडे या कायद्याच्या अंमलबजावणीचा आनंद साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे या कायद्याला अनेक राजकीय पक्षांनी विरोध करत मोदी सरकारला कोंडीमध्ये पाडण्याचा प्रयत्न केला आहे.

नुकताच स्वत:चा पक्ष काढून राजकारणामध्ये प्रवेश केलेल्या साऊथ सुपरस्टार थलापती विजयने (Thalapathy Vijay) सीएएला विरोध केला आहे. या कायद्यावरून त्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. थलापती विजयने यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सीएएला विरोध का हे देखील सांगितले आहे. सीएएची अंमलबजावणी स्वीकारली जाऊ शकत नसल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितले आहे. त्याची ही सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे.

थलापती विजयने सांगितले की, नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 या सारखा कोणताही कायदा देशामध्ये खपवून घेतला जाणार नाही. देशातील सर्व जनता बंधुभावाने एकत्र राहण्यास तयार असताना देखील अशा कायद्याची काय गरज आहे. तामिळनाडू सरकारने हा कायदा राज्यात लागू करू नये, असे आवाहन थलापती विजयने केले आहे. विजय व्यतिरिक्त अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सीएएला विरोध करत त्याच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होत असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) देशभरात लागू करण्यात आला. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. याअंतर्गत भारताच्या शेजारच्या तीन देशांतील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकणार आहे. यासाठी या लोकांना केंद्र सरकारने तयार केलेल्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर सरकारी तपासणीनंतर त्यांना या कायद्यानुसार नागरिकत्व दिले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाची काठीने बेदम मारहाण

Ashadhi Ekadashi : नागपूरच्या वारकऱ्याला पंढरीत दर्शन रांगेत काठीने मारहाण, सुरक्षारक्षकाची मुजोरी

Morning Tips: अंथरूणातून उठल्यानंतर या सवयी पाळा, भविष्यात होईल फायदा

WTC Points Table: भारताच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; पाहा भारत कोणत्या स्थानावर?

Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवा, जाणून घ्या महत्वाच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT