Kanguva Teaser canva
मनोरंजन बातम्या

Kanguva Movie: बॉबी देओलच्या 'कंगुआ' चित्रपटामुळे तुफान राडा; प्रेक्षक प्रचंड संतापले, थेट मोर्चाच काढला, नेमकं कारण काय?

Kanguva Postponed Date: साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि सूर्या यांचा आगामी चित्रपट कंगुवा लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची घोषणा होताच चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुक्ता निर्माण झाली आहे. नुकताचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. आता सिनेरसिक हा चित्रपट कधी पाहता येईल, याची वाट पाहत आहे. परंतु सूर्याचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगुवा चित्रपटातील बॉबीच्या खलनायक अवताराचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. बॉबीच्या खलनायक लूकमुळे चाहत्यांना चित्रपटाबद्दल उत्सुक्ता वाढलीय. चाहत्यांनी बॉबीच्या खलनायक पात्राला भरपूर पसंती देत आहेत. बॉबीचा हा लूक पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

बॉबीचा हा खलनायक अवतार आपल्याला साऊथ सुपरस्टार सूर्याच्या आगामी चित्रपट 'कंगुवा'मध्ये दिसणार आहे. 'कंगुवा' या चित्रपटाची सोशल मीडिया आणि कन्नड चित्रपटांमध्ये चर्चा होत आहे. परंतु सोशल मीडियावर चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊस विरोधात अनेक पोस्ट करण्यात आलेत. तमिळ सुपरस्टार सूर्या आणि बॉबी देओल यांचे चाहते त्यांच्या आगामी चित्रपटाची अनेक दिवसांपासून वाट बघत होते. परंतु काही कारणांमुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊसविरोधात नाराजी पाहायला मिळतेय.

माहितीनुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांकडून चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख बदलण्यात आलीय. पूर्वी 'कंगुवा' हा चित्रपट दसऱ्याला म्हणजेच १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, व्हीएफएक्सच्या कामात उशीर झाल्यामुळे त्याची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. 'कंगुवा' चित्रपटगृहांमध्ये यंदाच्या दिवाळीदरम्यान म्हणजेच 31 ऑक्टोबरला रिलीज होणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु, प्रोडक्शन हाऊसकडून चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत कोणत्याच प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

साऊथ सुपरस्टार रजनीकांतचा 'वेट्टैयान' हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'कंगुवा' आणि 'वेट्टैयान' या चित्रपटांमध्ये क्लॅश होऊ नये, यामुळे चित्रपटाची तारीख बदलण्यात आलीय. अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. त्यासोबतच #ShameOnYouStudioGreen हा Hashtag सध्या X वर ट्रेंड होताना दिसतोय. 'कंगुवा' चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 'कंगुवा' चित्रपटाचे दिग्दर्शन शिवा यांच्याकडून करण्यात आले आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

Accident : भीषण अपघात! कार-एसयूव्हीच्या धडकेत लागलेल्या आगीत ७ जण जिवंत जळाले

SCROLL FOR NEXT