Rajinikanth Travelled In Economy Class Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajinikanth Viral Video: रजनीकांत यांचा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास, साधेपणा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

Rajinikanth: रजनीकांत यांचा एक व्हिडीओ (Rajinikanth Video) सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो चर्चेत आला आहे. नुकताच रजनीकांत यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते फ्लाइटच्या इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करताना दिसत आहेत.

Priya More

Rajinikanth Travelled In Economy Class:

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) या नाही तर त्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. कधी चित्रपट तर कधी आपल्या साधेपणामुळे रजनीकांत चर्चेत असतात. रजनीकांत यांच्या चित्रपटांसोबतच त्यांचे चाहत्यांसोबतचे वागणे आणि साधेपणा सर्वांना प्रचंड आवडतो. रजनीकांत यांचा साधेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यांनी आपल्या साधेपणाच्या माध्यमांतून चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

रजनीकांत यांचा एक व्हिडीओ (Rajinikanth Video) सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो चर्चेत आला आहे. नुकताच रजनीकांत यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते फ्लाइटच्या इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करताना दिसत आहेत. सुपरस्टारचा हा साधेपणा सर्वांना प्रचंड आवडला आहे. चाहते या व्हिडिओवर कमेंट करत त्यांचे कौतुक करत आहेत.

रजनीकांत यांनी आंध्रप्रदेशातील कडप्पा येथून फ्लाइटने प्रवास केला. ऐवढ्या मोठ्या सुपरस्टारला फ्लाइटच्या इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करताना पाहून इतर प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला. सुपरस्टार रजनीकांत यांनी इकॉनॉमी क्लासमधून प्रवास केल्यामुळे त्यांचा साधेपणा सर्वांना प्रचंड आवडत आहे. रजनीकांत यांचे दोन व्हिडीओ व्हायरल होत आहे. पहिल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रजनीकांत हे फ्लाइटच्या इकॉनॉमी क्लासमध्ये एन्ट्री करतात. त्यानंतर ते विंडो सीटवर बसतात आणि कानामध्ये एअरपॉड्स घालतात.

दुसऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सुपरस्टार रजनीकांत हे फ्लाइटमधील इतर प्रवाशांसोबत गप्पा मारत आहेत. त्यांचे हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. या व्हिडीओला कमेंट्स करत चाहत्यांनी रजनीकांत यांचे कौतुक केले आहे. रजनीकांत यांच्यासोबत प्रवास केल्यामुळे अनेक प्रवाशांना खूप चांगले वाटले. त्यांनी सोशल मीडियावर रजनीकांत यांच्यासोबतचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, सध्या रजनीकांत हे आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 'थलायवर 170' या चित्रपटामध्ये ते बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत एकत्र काम करणार आहे. हे कलकार तब्बल ३३ वर्षांनंतर पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. या कलाकरांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूपच उत्सुक आहेत. अमिताभ बच्चन, फहद फासिल, राणा दग्गुबती, मंजू वॉरियर आणि दुशारा विजयन यांच्याही भूमिका या चित्रपटात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT