साऊथ सुपरस्टार रजनीकांत (South Superstar Rajinikanth) यांनी १२ डिसेंबर रोजी आपला ७३ वा वाढदिवस (Rajinikanth Bday) साजरा केला. रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'लाल सलाम'चा प्रोमो (Lal Salam Promo) आऊट करण्यात आला होता. त्यानंतर याच दिवशी रजनीकांत यांच्या 'थलायवर 170'च्या (Thalaivar 170) निर्मात्यांनी अखेर बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
थलायवाच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी खास टीझर रिलीज करून चित्रपटाच्या नावाचे अनावरण केले. या चित्रपटाच्या शीर्षकाच्या नुसत्या घोषणेने रजनीकांत यांच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्कंठा वाढली आहे. चित्रपट रिलीज होण्यापू्र्वीच रजनीकांत यांचे चाहते त्याला ब्लॉकबस्टर म्हणत आहेत. 'जय भीम' फेम टीजे ज्ञानवेल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे 'वेट्टैयान' असं नाव आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून रजनीकांत आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे तब्बल ३३ वर्षांनंतर एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे दोघेही सुपरस्टारचे चाहते त्यांच्या या आगामी चित्रपटाबाबत खूपच उत्सुक आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी खास टीझरची लिंक सोशल मीडियावर शेअर केली. त्यांनी लिहिले की, 'प्रतीक्षा संपली! सादर करत आहोत थलाईवर 170 चे शीर्षक वेट्टैयान. विशेष दिवशी थलाईवरची शक्ती, शैली आणि स्वॅग हायलाइट केला.' या चित्रपटात रजनीकांत यांच्याशिवाय अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.
वेट्टैयान हा चित्रपट रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांचे ३२ वर्षांनंतर एकत्र काम करण्याचे प्रतीक आहे. त्यांनी यापूर्वी 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम' या बॉलिवूड चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांच्या एकत्र काम करण्याबाबतचा खुलासा करताना रजनीकांत यांनी लिहिले होते की, 'बऱ्याच वर्षांनंतर मी माझे गुरू अमिताभ बच्चन यांच्यासोबत पुन्हा काम करत आहे. आगामी Lyca Thalaivar 170, T.J. ज्ञानवेल यांनी दिग्दर्शन केले. माझे हृदय आनंदाने धडधडत आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.