Toxic Movie Release: canva
मनोरंजन बातम्या

Toxic Movie Release: रॉकीचा चित्रपट देणार 'स्त्री'ला टक्कर, यशसोबत कियारा अन् नयनताराही झळकणार!

South Superstar Yash's New Film Announcement: के.जी.एफ स्टार यशची सध्या सोशल मीडियावर भरपूर चर्चा सुरु आहे. लवकरच यशचे दोन मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपासून श्रद्धा कपूरच्या 'स्त्री२' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत रॉकी भाईच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साऊथ सुपरस्टार रॉकी भाईच्या आगामी चित्रपटांची सर्वत्र चर्चा सुरु आहे. KGFच्या यशानंतर यशला भरपूर प्रसिद्ध मिळाली होती. KGF२ प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या येणाऱ्या चित्रपटांची घोषणा करण्यात आली होती. यश सध्या त्याच्या पुढच्या प्रोजेक्टसच्या कामामध्ये व्यस्थ आहेत. लवकरच त्यांचे २ नवीन चित्रपट येणार आहेत. त्याच्या पहिल्या चित्रपटाचे नाव 'विषारी' असे आहे ज्याचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे. नुकताच 'विषारी' या चित्रपटाची शुटिंग सुरु झाली आहे. 'विषारी' या चित्रपटामध्ये यश डॉनची भूमिका साकारताना दिसणार अशी चर्चा सुरु आहे. माहितीनुसार, या चित्रपटामध्ये यश सोबत कियारा अडवाणी, हुमा कुरेशी आणि नयनतारा दिसणार आहेत.

यशच्या दुसऱ्या चित्रपटाचे नाव 'रामायण' असून चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे. यश 'रामायण'मध्ये रावणाची भूमिका साकारणार आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे यश 'रामायण' चित्रपटाचा सहनिर्माता देखील आहे. यशनी या चित्रपटामध्ये भरपूर पैसे गुंतवले आहेत. थोड्या काळाच्या ब्रेकनंतर यश 'टॉक्सिक' चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक करणार आहे. काही दिवसांपूर्वी 'टॉक्सिक' चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. चित्रपटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला होता. प्रदर्शित झालेल्या व्हिडिओला चाहत्यांकडून भरपूर पसंती मिळाली होती. याच दरम्यान चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.

KGF फेम यशचे दोन नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . KGF2 नंतर चाहत्यांना आतूरता आहे ती त्याच्या KGF3ची. येत्या दोन वर्षांमध्ये चित्रपटाचे काम पूर्ण होईल. मीडिया रिपोर्टनुसार, KGF3मध्ये मुख्य भूमिका यश साकारनार नाही अशी चर्चा सुरु आहे. परंतु अद्यापही अशी अधिकृत माहिती समोर आली नाही. निर्मात्यांकडून देखील चित्रपटाबद्दल कोणत्या प्रकारची माहिती समोर आली नाही. परंतु, यशच्या जागी कोणता अभिनेता मुख्य भूमिका साकारणार असा प्रश्न अनेकांना पडला आह.

स्त्री २ या वर्षतील ब्लॉकबास्टर चित्रपट ठरला आहे. चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनय अनेक प्रेक्षकांना आवडला आहे. प्रेक्षकांच्या मते स्त्री २ यंदाच्या वर्षाची बेस्ट हॉरर कॉमेडी चित्रपट ठरणार आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून श्रद्धाच्या 'स्त्री२' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अवघ्या १३ दिवसांमध्ये चित्रपटाने ४०० कोटींची कमाई केली आहे. स्त्री २ या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT