Naga Chaitanya SAAM TV
मनोरंजन बातम्या

Naga Chaitanya : सुमडीत Engagement आता गुपचुप लग्न; नागा चैतन्यच्या वेडिंग लूकचा VIDEO व्हायरल

South Superstar Naga Chaitanya Wedding Look Viral : साउथ सुपरस्टार नागा चैतन्यचा खास व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात तो वेडिंग लूक करून बोहल्यावर चढलेला पाहायला मिळत आहे. यामुळे सर्वत्र त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.

Shreya Maskar

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने ( Naga Chaitanya ) या महिन्याच्या सुरुवातीला शोभिता धुलिपालासोबत (Sobhita Dhulipala) साखरपुडा केला. या दोघांनीही अगदी खाजगी पद्धतीने आपला साखरपुडा उरकला. आता काही दिवसांनंतर नागा चैतन्यचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, त्याने आता गुपचूप लग्न देखील केले आहे. ज्यामध्ये नागा चैतन्य फुलांनी सजवलेल्या कारमध्ये बसून बँडबाजासोबत जात आहे.

इतकंच नाही तर व्हिडिओमध्ये मिरवणुकीत बँडच्या तालावर लोक नाचताना दिसत आहेत. यात नागा चैतन्य शेरवानी घातलेला दिसत आहे. तो एका आलिशान कारमध्ये बसला असून काही लोक त्यासमोर बँडसोबत नाचतानाही दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हैदराबादचा असल्याचे सांगितले जात आहे. जेथे शोभिता आणि नागा चैतन्यने लग्न केले. मात्र, आतापर्यंत शोभिताचा कोणताही फोटो किंवा असा व्हिडिओ समोर आलेला नाही.

व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून अनेक कमेंट्स येत आहेत. काही लोक म्हणत आहेत की, या जोडप्याने गुपचूप लग्न केले आहे तर काहींना हा व्हिडिओ जुना वाटत आहे. चाहते आता शोभिता आणि चैतन्यच्या लग्नाचे फोटो शेअर करण्याची वाट पाहत आहेत. नागा चैतन्यच्या साखरपुड्या वेळी त्याची एक्स बायको अभिनेत्री समंथा हिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avocado Sandwich Recipe : सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा हेल्दी ॲव्होकॅडो सँडविच, दीर्घकाळ पोट भरलेले राहील

Bigg Boss 19 : "लाइन मत क्रॉस करणा..." सलमान खानने फरहाना भट्टला दिली शेवटची वॉर्निंग, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची घेतली भेट

Grah Gochar November: नोव्हेंबर महिन्यांच्या २३ दिवसांमध्ये ३ ग्रह करणार गोचर; ४ राशी जगणार राजासारखं आयुष्य

Phaltan Doctor Death Case : फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी बातमी! गोपाळ बदनेचं आत्मसमर्पण, तपासाला वेग

SCROLL FOR NEXT