Actor Vijay Deverakonda Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vijay Deverakonda Kushi Movie: 'कुशी'च्या यशानंतर विजय देवरकोंडा पोहचला देवाच्या दारी, कुटुंबासह घेतलं यदाद्री मंदिरात दर्शन

Kushi Movie Box Office Collection: या चित्रपटाच्या यशानंतर विजय देवरकोंडा यदाद्री देवाच्या दर्शनासाठी पोहचला. कुटुंबीयांसोबत विजयने देवाचं दर्शन घेतलं.

Priya More

Kushi Movie News:

साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (South Actor Vijay Deverakonda) सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कुशी' चित्रपटामुळे (Kushi Movie) चर्चेत आहे. समंथा रुथ प्रभू आणि विजय स्टारर 'कुशी' चित्रपट १ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या चित्रपटाच्या यशानंतर विजय देवरकोंडा यदाद्री देवाच्या दर्शनासाठी पोहचला. कुटुंबीयांसोबत विजयने देवाचं दर्शन घेतलं. त्याचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत.

'कुशी' या चित्रपटासाठी चाहत्यांचे प्रेम पाहून विजय देवरकोंडाने नुकताच आपल्या कुटुंबासह तेलंगणातील यादद्री मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. रविवारी सकाळी विजय देवरकोंडा कुटुंबासह देवाच्या मंदिरामध्ये पोहचला. यावेळी त्याने यादद्री मंदिरात देवाची पूजा करत प्रार्थना केली. विजयने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि लुंगी असा पारंपारिक पोशाख परिधान केला होता.या ड्रेसिंगमध्ये तो खूपच क्यूट दिसत होता.

विजय देवराकोंडा मंदिरामध्ये आल्याची माहिती मिळताच त्याचे चाहते आणि भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला. विजयला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी सर्वांनी मोठी गर्दी केली. विजयची एक झलक पाहण्यासाठी मंदिर परिसरात त्याच्या चाहत्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याची देखील घटना घडली. विजयचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

विजय आणि समंथा यांचे आधीचे चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यानंतर आता 'कुशी' चित्रपटाच्या माध्यमातून ते पुन्हा यशाचे शिखर गाठण्याच्या तयारीत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या जबरदस्त प्रतिसादामुळे दोन्ही कलाकार खूपच खुश आहेत. काही दिवसांपूर्वी विजयने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्याचे आभार मानले होते.

दरम्यान, कुशी चित्रपटाने पहिल्याच दिवशी म्हणजे १ सप्टेंबर रोजी १५.२५ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने १० कोटींची कमाई केली होती. रविवारी म्हणजे ३ सप्टेंबरला या चित्रपटाने १० कोटींची कमाई केली. हे सर्व मिळून या चित्रपटाची एकूण कमाई ३५.१५ कोटी रुपये झाली आहे. ५ वर्षांनंतरचा हा चित्रपट विजय देवरकोंडाचा पहिला हिट चित्रपट असल्याचे म्हणायला काही हरकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT