Jr NTR Instagram @jrntr
मनोरंजन बातम्या

Jr NTR Life: ज्युनियर एनटीआर कमी वयातच अडकला होता लग्नबंधनात, पाहूया कोण आहे अभिनेत्याची पत्नी?

ज्युनियर एनटीआरचे लग्न वयाच्या २६व्या वर्षीच झाले.

Pooja Dange
Golden Globe Award

'नाटु नाटु' या गाण्याला गोल्डन ग्लोबल अवॉर्ड मिळाल्याने साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरची (Jr NTR) सर्वत्र चर्चा आहे. ज्युनियर एनटीआरसह त्याच्या कुटुंबियांसाठी आणि फॅन्ससाठी हे क्षण खूप खास आहेत.

Golden Globe Award

वीस वर्षात पहिल्यांदाच असे घडले आहे की, एका भारतीय चित्रपटातील एका गाण्याला बेस्ट ओरिजिनल गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाला आहे. यावेळी ज्युनियर सोहळ्याला एनटीआरसह त्याची पत्नी लक्ष्मी प्रणती सुद्धा त्याच्यासोबत उपस्थित होती.

Jr NTR With Wife Lakshmi Pranathi

ब्लॅक वेलवेट गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिला पाहून कोणीच म्हणणार नाही की ती दोन मुलांची आई आहे. लक्ष्मी प्रणती तीशीत आहे. तसेच फिटनेसच्या बाबतीत ती जागरूक आहे.

Jr NTR With Wife Lakshmi Pranathi

ज्युनियर एनटीआर आणि लक्ष्मी प्रणती यांचा प्रेमविवाह झालेला नाही. ज्युनियर एनटीआरने त्याच्या आई-वडिलांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न केले आहे. ज्युनियर एनटीआरचे लग्न वयाच्या २६व्या वर्षीच झाले. त्यावेळी त्याची पत्नी लक्ष्मी प्रणती १८ वर्षाची होती. २०११साली पारंपरिक पद्धतीने त्यांच्या विवाहसोहळा पार पडला.

Jr NTR With Wife Lakshmi Pranathi

ज्युनियर एनटीआरच्या लग्नामध्ये त्याच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींसह त्याचे फॅन्स देखील उपस्थित होते, असे म्हटले जाते. जवळपास १२ हजार फॅन्स त्याच्या लग्नाला आले होते. त्याच्या लग्नसोहळ्याला १०० करोडचा खर्च करण्यात आला होता.

Jr NTR's Wife Lakshmi Pranathi

ज्युनियर एनटीआरची पत्नी लक्ष्मी प्रणतीची शिक्षण हैद्राबाद येथे झाले आहे. तिचे वडील श्रीनिवास राव बिसनेसमॅन आहेत. त्यांचे तेलगू चॅनेल सुद्धा आहे. ज्युनियर एनटीआरशी तिचे लग्न झाल्यानंतर लक्ष्मी लाईमलाईटमध्ये आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valentine Day 2026 : लग्नानंतरचा पहिला 'व्हॅलेंटाईन डे' होईल खूपच खास, वाचा 'या' ५ रोमँटिक आयडिया

IND vs NZ: तिसरा वनडे सामना ठरणार निर्णायक; कोण जिंकणार सिरीज? पाहा कशी असेल भारताची प्लेईंग ११

Solapur Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर कारचा भंयकर अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू

BMC Mayor: मुंबईतील जागांचा हट्ट पुरवला, पण भाजपला फटका बसला, शिंदेंना अडीच वर्षाचा महापौर देणार का?

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज,ताकतीने लढण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT