Captain Miller Released Date Instagram @sathyajyothifilms
मनोरंजन बातम्या

Captain Miller Released Date Out: धनुषच्या 'कॅप्टन मिलर'ची रिलीज डेट जाहीर: प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने कमवले २५ कोटी

Superstar Dhanush Movie: दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा 'कॅप्टन मिलर' चित्रपटाची रिलीज डेट आऊट झाली आहे.

Pooja Dange

Captain Miller New Poster:

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा 'कॅप्टन मिलर' चित्रपटाची रिलीज डेट आऊट झाली आहे. अरुण माथेश्वरन दिग्दर्शित हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होणार आहे.

सत्यज्योती फिल्म्स या निर्मिती संस्थने त्यांच्या सोशल मीडिया चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत चित्रपट डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. धनुष आणि शिवा राजकुमार यांचा 'कॅप्टन मिलर' १५ डिसेंबर प्रदर्शित होणार आहे.

'कॅप्टन मिलर' चित्रपटाचे परदेशातील राईट 'Lyca Productions' या संस्थेने विकत घेतले आहेत. या संस्थेने धनुषच्या चित्रपटाचे हक्क दुप्पट किंमतीला विकत घेतले असल्याची चर्चा आहे.

धनुषकडे खूप सध्या खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहेत. अशातच 'कॅप्टन मिलर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने धनुषचे चाहते खूप उत्सुक आहेत. ही उत्सुकता अजून वाढवायला 'Lyca Productions;ने ट्विट करत लिहिले आहे की, '१५ डिसेंबरला थिएटरमध्ये धमाका होणार आहे! 'कॅप्टन मिलर'च्या ओव्हरसीज रिलीजचे थिएट्रिकल अधिकार आम्हाला मिळायचा खूप आनंद आहे.' 'कॅप्टन मिलर'चे राईट २५ कोटींना विकले गेल्याची चर्चा आहे.

'कॅप्टन मिलर'ची कथा

'कॅप्टन मिलर' चित्रपटामध्ये धनुष एका स्वत्रंत्र सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट स्वातंत्रपूर्व काळातील आहे. या चित्रपटामध्ये ब्रिटिशांविरोधातील लढा दाखविण्यात येणार आहे.

प्रियांका मोहन या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. तर कन्नड अभिनेता शिवा राजकुमार 'कॅप्टन मिलर'मध्ये धनुषच्या भावाची भूमिका साकारणार आहे. शिवा राजकुमारने 'जेलर' चित्रपटातून तामिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. दाक्षिणात्य कलाकार संदीप किशन, विनायकन, जॉन कोकेन आणि निवेदिता सतीश यांच्या या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. (Latest Entertainment News)

'कॅप्टन मिलर'च्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू झाले आहे. धनुष वगळता इतर सर्व स्टार्सचे डबिंग पूर्ण झाले आहे. धनुष देखील त्याचे डबिंग लवकरच पूर्ण करेल. सध्या तो 'D50' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

'कॅप्टन मिलर' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

SCROLL FOR NEXT