Naga Chaitnya And Shobhita Dhulipala Engagement Rumours  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Naga Chaitnya Engagement : समंथासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य दुसरा संसार थाटणार ? आजच पार पडणार 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत साखरपुडा

Naga Chaitnya And Shobhita Dhulipala Engagement : अभिनेता नागा चैतन्य आज पुन्हा एकदा एका नव्या बंधनात अडकायला तयार आहे. मीडिया रिपोर्टनुसार नागा चैतन्य प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रीसोबत साखरपुडा करणार असल्याचं बोललं जातंय.

Chetan Bodke

टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आणि समंथा रूथ प्रभूचा एक्स पती नागा चैतन्य कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतो. २०२१ मध्ये नागा चैतन्यने अभिनेत्री समंथा रूथ प्रभूसोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर अभिनेत्याचं सतत एका प्रसिद्ध बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्रीसोबत नाव जोडलं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्याही चर्चा सुरू होत्या. पण आता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला साखरपुडा करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

द ग्रेट आंध्राला एका विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला आज म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी साखरपुडा करणार आहेत. या एक्स पेजने साखरपुड्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अनेकदा नागा चैतन्य आणि शोभिता दोघेही एकत्र स्पॉट झाले आहेत. पण तरीही त्यांनी दोघांनीही रिलेशनच्या चर्चांना पुष्टी दिली नाही. त्या शिवाय ते दोघेही युरोप ट्रीपला सुद्धा एकत्र गेले होते. तेव्हा त्यांचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

त्या ट्रीपपासूनच सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनची चर्चा सुरू झाली. साऊथ सुपरस्टार आणि नागा चैतन्यचे वडील नागार्जुनसहीत त्यांचे सर्व कुटुंबीय साखरपुड्यासाठी उत्सुक आहेत. साखरपुड्याचे फोटो आजच अर्थात शुक्रवारी सोशल मीडियावर येण्याची शक्यता आहे, असे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. नागा चैतन्यने २०१७ मध्ये समंथासोबत लग्न केले. त्यानंतर त्यांचे चार वर्ष लग्न टिकले. पण, लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांच्या मतभेद सुरू झाले. त्यामुळे नागा चैतन्य आणि समांथा ऑक्टोबर २०२१ मध्ये वेगळे झाले.

घटस्फोटानंतर, समंथा कामात पूर्णपणे व्यस्त झाली आणि ती अजूनही सिंगल आहे. तर नागाचं नाव शोभिता धूलिपलासोबत जोडलं गेलं आहे. दोघंही टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT