KP Choudhary Google
मनोरंजन बातम्या

KP Choudhary Death: चित्रपट निर्मात्यानं केली आत्महत्या; फिल्म इंडस्ट्रीत खळबळ

KP Choudhary : दक्षिणेतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते केपी चौधरी यांनी आत्महत्या केली आहे. २ वर्षांपूर्वी त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती.

Shruti Vilas Kadam

KP Choudhary Death: प्रसिद्ध दक्षिण भारतीय चित्रपट निर्माते के पी चौधरीने सोमवारी गोव्यात जीवन संपवले आहे. गोवा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या तपासात असे कळून आले आहे की ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर आर्थिक संकट आणि कामाच्या अभावामुळे डिप्रेशनमध्ये चौधरीने ही टोकाची भूमिका घेतली आहे.

चित्रपट निर्माते आर्थिक संकटाचा सामना करत होते

केपी चौधरी म्हणजेच शंकरा कृष्ण प्रसाद चौधरी हा टॉलीवूडमधील एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहेत. त्यांनी २०१६ मध्ये रजनीकांतचा सुपरहिट चित्रपट 'कबाली' ची निर्मिती केली. २०२३ मध्ये, केपी चौधरी यांना सायबराबाद स्पेशल ऑपरेशन्स टीमने ड्रग्जशी संबंधित प्रकरणात अटक केली होती.

चौकशी केल्यावर असे आढळून आले की त्याचे क्लायंट केवळ टॉलीवूडमध्येच नाही तर कॉलीवूडमध्येही होते. सुरुवातीच्या अहवालांमधून असे दिसून आले आहे की या प्रकरणानंतर, तो आर्थिक अडचणींचा सामना करत होता आणि त्याच्या कर्जदारांकडून त्याच्यावर दबाव होता. चित्रपट उद्योगात अपयश आल्यानंतर, तो ड्रग्ज डीलिंगच्या कामांमध्ये सामील झालाचा आरोप करण्यात आला आहे. डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, त्याने गोव्यात ओएचएम पब देखील उघडला होता जिथून तो प्रसिद्ध सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवत असे.

केपी चौधरी यांनी रजनीकांतच्या चित्रपटात पैसे गुंतवले होते

२०१६ मध्ये, रजनीकांतचा सुपरहिट चित्रपट 'कबाली' प्रदर्शित झाला, ज्याची निर्मिती केपी चौधरी यांनी केली होती. इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, चित्रपटाने तेव्हा जगभरात ६५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. आणि त्या वर्षी तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या चित्रपटांच्या यादीत तो अव्वल स्थानावर होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT