Narcotics Smuggling Racket Busts Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tamil Film Producer: तमिळ चित्रपट निर्मात्याची 'पुष्पा' स्टाईल तस्करी, २००० कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंड

Narcotics Smuggling Racket Busts: भारतामधून नारळाच्या पावडरमध्ये स्यूडोफेड्रिन हे रसायन परदेशामध्ये पाठवले जात होते. हा तमिळ चित्रपट निर्माता सध्या फरार असून एनसीबीकडून (NCB) त्याचा शोध सुरू आहे.

Priya More

NCB And Delhi Police:

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून (South Film Industry) एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. २००० कोटी रुपयांच्या ड्रग्ज रॅकेटचा (Drugs Racket) मास्टरमाईंड तमिळ चित्रपट निर्माता निघाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारे स्यूडोफेड्रिन या रसायनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. भारतामधून नारळाच्या पावडरमध्ये स्यूडोफेड्रिन हे रसायन परदेशामध्ये पाठवले जात होते. हा तमिळ चित्रपट निर्माता सध्या फरार असून एनसीबीकडून (NCB) त्याचा शोध सुरू आहे.

अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले आहे. एनसीबी आणि दिल्ली पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. याप्रकरणी दिल्लीमधील तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून ड्रग्ज बनवण्यासाठी वापरण्यात येणारे स्यूडोफेड्रिन हे रसायन मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहे. स्यूडोफेड्रिनचा मोठा साठा भारतातून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुक्या नारळाच्या पावडरमध्ये लपवून पाठवला जात होता.

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्स तस्करीच्या नेटवर्कचा मास्टरमाइंड तमिळ चित्रपट निर्माता असून तो सध्या फरार आहे. एका निवेदनात एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी खुलासा केला की, अटक केलेल्या तीन व्यक्तींनी अंमली पदार्थ विरोधी एजन्सीला सांगितले की, त्यांनी गेल्या तीन वर्षांत एकूण ४५ स्यूडोफेड्रिन शिपमेंट पाठवल्या आहेत. या शिपमेंटमध्ये अंदाजे ३५०० किलो स्यूडोफेड्रिन होते. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे किंमत २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

ज्ञानेश्वर सिंह यांनी पुढे सांगितले की, चार महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एनसीबी आणि दिल्ली पोलिसांच्या पथकांनी नेटवर्कचा पर्दाफाश केला. सुक्या खोबऱ्याच्या पावडरमध्ये दडवून ठेवलेला स्यूडोफेड्रिनचा मोठा साठा भारतातून दोन्ही देशांमध्ये पाठवला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. यूएस ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशनने (DEA) या शिपमेंटचा स्रोत दिल्ली असल्याचे दर्शविणारी गुप्तचर माहिती दिली आहे.

तिन्ही आरोपींना दिल्लीत अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ५० किलो वजनाचे स्यूडोफेड्रिन जप्त करण्यात आले आहे. हे तिघेही तामिळनाडूचे रहिवासी आहेत. या ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाईंड तामिळ चित्रपट निर्माता असल्याची ओळख पटली असून तो सध्या फरार आहे. स्यूडोफेड्रिनचा स्रोत शोधून काढण्यासाठी त्याला अटक करण्याचे प्रयत्न एनसीबी आणि दिल्ली पोलिसांकडून सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

SCROLL FOR NEXT