Rajinikanth Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajinikanth Viral Video: सेम टू सेम रजनीकांत! पायात स्लिपर आणि हाफ पँट घातलेल्या 'थलाइवर'ला पाहून चाहते चकीत, VIDEO व्हायरल

Priya More

Rajinikanth Video:

देशातल्या प्रसिद्ध सुपरस्टारमध्ये रजनीकांत (Rajinikanth) यांचे नाव घेतले जाते. रजनीकांत यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. फक्त भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. रजनीकांत यांनी वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आजही ते सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांच्या चित्रपटांची चाहते आजही आतुरतेने वाट पाहतात.

रजनीकांत यांचा चित्रपट म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी जल्लोष असतो. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक असतात. अशामध्ये सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती सेम टू सेम रजनीकांत यांच्यासारखीच आहे. हा व्हिडीओ पाहून रजनीकांत यांचे चाहते चकीत झाले आहेत.

सध्या रजनीकांत हे त्यांच्या चित्रपटामुळे नाही तर एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. सध्या सोशल मीडियावर रजनीकांत यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सध्या या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ पाहून रजनीकांत यांचे चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत. या व्यक्तीची हेअर स्टाईल आणि लूक सेम टू सेम रजनीकांत यांच्यासारखाच आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रजनीकांत यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभी राहिल्याची दिसत आहेत. ही व्यक्ती हुबेहूब 'थलाइवर'सारखी दिसत आहे आणि त्याची हेअरस्टाइलही त्यांच्यासारखीच आहे. ही व्यक्ती निळ्या रंगाचा शर्ट आणि शॉर्ट पँटमध्ये दिसत आहे. या व्यक्तीने पायात स्लिपर घातली आहे. त्याने रजनीकांत यांच्यासारखा चष्मा घातलेला दिसत आहे.

हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ @despoters_12345 नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच ट्विटरवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे दिसणे आणि बोलणे एकदम रजनीकांत यांच्यासारखे आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रजनीकांत यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या या व्यक्तीबाबत जास्त माहिती उपलब्ध झाली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांच्यासारखी दिसणारी ही व्यक्ती कोची येथे चहा विकते, असा दावा केला जात आहे. कोची हे भारतातील केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. दरम्यान, या व्हिडीओवर नेटिझन्सनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, 'पूर्णपणे रजनीकांतसारखा वाटत आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'विश्वास बसत नाही की तो 100 कोटी कमावतो.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT