Amala Paul Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amala Paul Wedding: अमाला पॉलने बॉयफ्रेंड जगत देसाईसोबत गुपचूप केलं लग्न, फोटो पाहताच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Amala And Jagat Wedding: दोघांनीही त्यांच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Priya More

Amala Paul And Jagat Desai:

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये (south film industry) एकापाठोपाठ एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. नुकताच साऊथचा प्रसिद्ध अभिनेता वरुण तेजने गर्लफ्रेंड लावण्या त्रिपाठीसोबत इटलीमध्ये लग्न केले. वरुणनंतर रविवारी आणखी एक साऊथ अभिनेत्री विवाहबंधनात अडकली.

अभिनेत्री अमाला पॉल (Amala Paul) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली. अमालाने बॉयफ्रेंड जगत देसाईसोबत (Jagat Desai) लग्नगाठ बांधली. दोघांनीही त्यांच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमाला पॉलने बॉयफ्रेंड जगत देसाईसोबत गुपचूप लग्न केले. कोची बोलगट्टी येथे या कपलचा शाही लग्नसोहळा पार पडला. कोचीमध्ये या कपलने लव्हेंडर थीमवर लग्न केले. घांनी ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. अमालाच्या लग्नाचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते या फोटोंवर कमेंट्स करत दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

रविवारी अमालाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर जगतसोबतच्या लग्नाचे फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये दोघेही लव्हेंडर कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होते. दोघांच्या लग्नाचे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत. लग्नाचे फोटो शेअर करत अमाला पॉलने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ते प्रेम आणि अनुग्रहाचा आनंद साजरा करत आहे ज्याने आम्हाला एकत्र आणले. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद शोधत आहोत.' यासोबत तिने टियारा इमोजी आणि चमकदार इमोजीसह रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

अमालाने तमिळ, मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमाला पॉलने या वर्षाच्या सुरुवातीला अजय देवगणच्या 'भोला' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अमाला पॉलने यापूर्वी तमिळ दिग्दर्शक एएल विजयसोबत लग्न केले होते. पण लग्नाच्या तीन वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर अमाला पॉल जगत देसाईच्या प्रेमात पडली. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी रविवारी लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

SCROLL FOR NEXT