Mahesh Babu Turns At 49 Years Saam Tv
मनोरंजन बातम्या

Happy Birthday Mahesh Babu: दाक्षिणात्य सुपरस्टारचा युएसमध्ये डंका, ४९ व्या वर्षी गाजले ‘इतके’ चित्रपट

Mahesh Babu Turns At 49 Years: दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचा आज अर्थात (९ ऑगस्ट) रोजी तो ४८वा वाढदिवस साजरा करतोय.

Chetan Bodke

Happy Birthday Mahesh Babu: दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचा आज अर्थात (९ ऑगस्ट) रोजी तो ४८वा वाढदिवस साजरा करतोय. महेश बाबूने आपल्या उत्तम दमदार अभिनयाने दक्षिणात्य मनोरंजन विश्व चांगलेच गाजवले आहे.

महेश बाबूचा जन्म चेन्नईमध्ये झालाय. टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक शिव राम कृष्ण घट्टमनेनी हे महेश बाबूचे वडील होते. बालपणापासूनच महेशला अभिनयाची आवड होती. त्याने अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे.

तेलुगू सिनेसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये महेश बाबू अव्वल क्रमांकामध्ये आहे. महेश बाबूच्या नावावर जी. महेश बाबू नावाचं प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. महेशने सिनेसृष्टीत बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते. त्याने त्याच्या सिनेकारकिर्दित आठ चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम पाहिले आहे. १९९९ मध्ये राजकुमारूडू चित्रपटात त्याने मुख्य अभिनेता म्हणून काम पाहिले आहे. त्या चित्रपटाकरिता महेशला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठी नंदी पुरस्कार जिंकला.

महेश बाबूने आतापर्यंत २७ चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केले आहे. त्याच्या ११ चित्रपटांनी अमेरिकेतील बॉक्स ऑफिसवर १ मिलियन डॉलर इतकी कमाई केली आहे. महेश बाबूच्या नावावर यूएस मार्केटमध्ये सर्वाधिक १ मिलियन डॉलर इतकी त्याच्या चित्रपटांनी सर्वाधिक कमाई केली आहे.

यूएस बॉक्स ऑफिसवर महेश बाबूचे सलग ९ चित्रपट कोट्यवधींची कमाई करणारा तो एकमेव अभिनेता ठरला आहे. त्याने आपल्या सिने कारकिर्दित आठ नंदी पुरस्कार, पाच तेलुगू फिल्मफेअर पुरस्कार, चार SIIMA पुरस्कार, तीन CineMAA पुरस्कार आणि एक आयफा उत्सवम पुरस्कार सह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

२०११ मध्ये प्रदर्शित झालेला डूकुडू हा चित्रपट तेलगू-भाषेतील ॲक्शन कॉमेडी चित्रपट होता. त्याचे दिग्दर्शन श्रीनु वैतला यांनी केले होते, तर वैटला, कोना वेंकट आणि गोपीमोहन यांनी चित्रपटाची कथा लिहिली होती. त्याच्या चित्रपटाने भारतातच नाही तर परदेशातही कोट्यवधींचा गल्ला जमावला होता. त्यानंतर २०१४ मध्ये, श्रीनू वैतला दिग्दर्शित अगडू या तेलूगु ॲक्शन कॉमेडी चित्रपटातही प्रमुख भूमिका साकारली होती. सोबतच २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या श्रीमंथुडू चित्रपटाने चाहत्यांसोबतच समीक्षकांचेही मने जिंकले होते.

महेश बाबूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, महेश बाबू RRR चे दिग्दर्शक एसएस राजामौलींसोबत आगामी चित्रपटाची तयारी करत आहे, सध्या त्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘सरकार वारी पाता’ या चित्रपटात महेश अखेरच दिसला होता, त्याच्या त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT