Kanakalatha Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kanakalatha Dies : प्रसिद्ध अभिनेत्रीचे प्रदीर्घ आजाराने निधन; २५० हून अधिक चित्रपटांत केले होते काम

Kanakalatha Passed Away : प्रसिद्ध अभिनेत्री कनकलथा यांचे सोमवारी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

Chetan Bodke

मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कनकलथा यांचे सोमवारी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी अभिनेत्रीने तिरुवनंतरपुरम मधील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या ३ वर्षांपासून कनकलथा डिमेंशिया नावाच्या आजारापासून त्या त्रस्त होत्या. डिमेंशिया ह्या आजारामुळेच त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे.

तीन वर्षांपासून त्या गंभीर आजारी होत्या. कनकलथा यांना निद्रानाश आणि स्मृतिभ्रंश झाल्याने त्या गंभीर आजारी झाल्या होत्या. त्यांना झोपेसंबंधित हा आजार होता. २०२२ मध्ये त्यांना डिमेंशिया नावाच्या आजाराचे निदान झाले होते.

कनकलथा यांच्या निधनाचे वृत्त कळताच, मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी आणि लाखो चाहत्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहली. कनकलथा यांनी विविध भाषांमधील २५० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. त्यांनी अनेक मालिका, नाटक, शोजमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

गेल्या ३८ वर्षांपासून कनकलथा सिनेसृष्टीमध्ये सक्रिय होत्या. १९७८ मध्ये त्यांनी अभिनयामध्ये पदार्पण केले आहे. कनकलथाने चित्रपट, मालिका आणि अनेक टेलिव्हिजन रिॲलिटी शोमध्ये काम केले होते. कनकलथा यांनी वयाच्या २२ व्या वर्षी लग्न केलं आणि लग्नाच्या १६ वर्षांनंतर घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर कनकलथाची बहिण विजयम्मा हिने त्यांचा सांभाळ केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rule Change: LPG गॅस सिलिंडरचे दर वाढणार की कमी होणार? १ जानेवारीपासून जाहीर होणार नव्या किमती

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळालं नववर्षाचं गिफ्ट; लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात

Maharashtra Police: महापालिका निवडणुकांआधी पोलीस खात्यात मोठा फेरबदल, सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक

मंत्री गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाला धक्का, उमेदवारी अर्ज बाद, नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope: प्रेमात मिळेल यश, वैवाहिक जीवनात येणार आनंदी आनंद; जाणून घ्या कसा असेल नव्या वर्षाचा पहिला दिवस

SCROLL FOR NEXT