Samantha Ruth Prabhu Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

Samantha Prabhu Resolution: दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा प्रभूने केला नवीन वर्षाचा संकल्प, म्हणते 'सगळं करा पण....'

मंथा प्रभूने चाहत्यांना 2023 च्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Pooja Dange

Samantha Prabhu New Year Celebration: दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा हिने बॉलिवूडमध्ये स्वतःच्या अभिनयाने जादू केली आहे. समंथा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. 'यशोदा' चित्रपटातून समंथा पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी झाली आहे. समंथाच्या 'पुष्पा' चित्रपटातील 'अंटवा' गाण्यावरील डान्सने सर्व प्रेक्षकांना वेड लावले होते. समंथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने नुकत्याच तिच्या इन्स्टाग्राम एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट प्रचंड चर्चेत अली आहे.

समंथा रुथ (Samantha)प्रभूने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने स्वतःचा एक अतिशय क्यूट फोटो शेअर केला आहे. यासोबत समंथाने तिच्या नवीन वर्षाच्या संकल्पाचा कॅप्शनमध्ये उल्लेख केला आहे. यासह, समंथा प्रभूने तिच्या चाहत्यांना 2023 च्या नवीन वर्षाच्या आगाऊ शुभेच्छा दिल्या आहेत.

समंथाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की- सेलिब्रेट करण्यासाठी तयार… तुम्ही जे काही कराल ते नियंत्रित राहून करा. हीच वेळ आहे नवीन आणि सोप्या संकल्पांची… त्यातील एक म्हणजे स्वतःशी दयाळू आणि नम्र राहा… देव सर्वांना आशीर्वाद देवो, नवीन वर्ष २०२३ च्या शुभेच्छा. समंथा प्रभूने या नवीन वर्षाच्या संकल्पाद्वारे एक मोठा संदेश दिला आहे. तिची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे.

दक्षिणेत समंथा रुथ प्रभूने जादू केली आहे. तिचा 'पुष्पा' चित्रपट (Movie)सुपरहिट झाल्यानंतर, सस्पेन्स आणि अॅक्शनने भरलेला थ्रिलर चित्रपट 'यशोदा'ही लोकांना आवडला होता. या चित्रपटात प्रेक्षकांना समंथाचा अॅक्शन अवतार पाहायला मिळाला. या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये चांगलीच कमाई केली. या चित्रपटातील समंथा प्रभूच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले होते.

समंथा रुथ प्रभू गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आजारपणामुळे चर्चेत आहेत. तिने तिच्या एका पोस्टमध्ये या आजाराचा खुलासा केला होता. तिने सांगितले होते की, ती मायोसिटिस नावाच्या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. सध्या समंथा पूर्णपणे तिच्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

Hair Care : घरच्या घरी बनवा हे हेअर जेल, राठ केस होतील मऊ आणि चमकदार

Zp School : शाळेत सुविधांची वानवा; विद्यार्थिनीचे सरपंच- ग्रामसेवकाला पत्र, व्यथा मांडत सुधारण्याची मागणी

Pivali Sadi Song: संसाराच्या गाड्यातून वैयक्तिक आयुष्याला सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी; 'पिवळी साडी' गाण्याची प्रेक्षकांमध्ये क्रेझ

Gateway Of India: गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आणि खास 10 मनोरंजक तथ्ये

SCROLL FOR NEXT